जर तुम्ही वनप्लसचा फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 6T खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. इ-कॉमर्स कंपनी Amazon चा ‘समर सेल’ 4 मेपासून सुरू होत आहे. या सेलमध्ये OnePlus 6T वर मोठ्या प्रमाणात सवलत देण्यात येत आहे. या स्मार्टफोनवर 9 हजार रुपयांची सवलत देण्यात येईल असं अॅमेझॉनकडून जाहीर करण्यात आलं आहे.

अॅमेझॉनच्या समर सेलमध्ये 9 हजार रुपयांच्या सवलतीसह OnePlus 6T चा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला फोन 32,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. सध्या या फोनची किंमत 41 हजार 999 रुपये आहे. OnePlus 6T ची ही आतापर्यंतची सर्वात कमी किंमत आहे. याशिवाय एसबीआयच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांना 10 टक्के सुट मिळणार आहे. याव्यतिरिक्त OnePlus 6T चे अन्य दोन व्हेरिअंट्सही आहेत, मात्र त्यांच्यावर काय ऑफर आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

4 मेपासून 7 मेपर्यंत अॅमेझॉनचा हा सेल असणार आहे. अॅमेझॉन प्राइम मेंबर्ससाठी 24 तास आधी म्हणजे 3 मेपासून हा सेल सुरू होत आहे. या सेलमध्ये मोबाइल, लॅपटॉप, टीव्हीसोबतच किचन अप्लायन्सेसवर भरघोस सवलत दिली जाणार आहे. मोबाइल फोन्सवर 40 टक्के पर्यंत सूट देण्यात येणार आहे. तर या सेलमध्ये जवळपास पाच हजारांहून अधिक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्टवरही सवलत दिली जाईल. टी.व्ही व अन्य काही इलेक्ट्रिक्स वस्तुंवर 60%पर्यंत डिस्काउंट मिळेल.