04 March 2021

News Flash

फक्त दोन मिनिटांत 1.5 लाखांहून जास्त विक्री, रिअलमीच्या ‘स्वस्त’ फोनला जबरदस्त प्रतिसाद

सेल सुरू होताच दोन मिनिटांत 1.5 लाखांहून जास्त फोनची विक्री...

रिअलमी कंपनीने Realme C11 या लेटेस्ट बजेट स्मार्टफोनसाठी काल (दि.23) भारतात पहिल्यांदाच फ्लॅश सेलचं आयोजन केलं होतं. या सेलमध्ये Realme C11 ला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाल्याचं समोर आलं आहे. ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्ट आणि रिअलमी इंडियाच्या  वेबसाइटवर दुपारी 12 वाजता सेल सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन मिनिटांतच 1.5 लाखांहून जास्त Realme C11 फोनची विक्री झाली, असा दावा कंपनीने केला आहे. ट्विटरद्वारे रिअलमी कंपनीने याबाबत माहिती दिली.


फीचर्स :-
कंपनीने Realme C11 हा नवीन बजेट स्मार्टफोन गेल्या आठवड्यात भारतात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन गेल्या महिन्यात मलेशियामध्ये लाँच करण्यात आला होता. या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे यात मीडियाटेक हीलियो जी35 प्रोसेसर आणि 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरी दिली आहे. शानदार फोटोग्राफीसाठी कॅमेऱ्यामध्ये AI फीचरही दिले आहे.  रियलमी सी11 मध्ये 6.5 इंच एचडी+ (720×1600 पिक्सल) मिनीड्रॉप डिस्प्ले आहे. प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3+ असून 2.3 गीगाहर्ट्ज़ ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी35 प्रोसेसर दिले आहे. 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असलेल्या या फोनला मेमरी कार्डचाही सपोर्ट आहे. अँड्रॉइड 10 बेस्ड रिअलमी यूआयवर आधारित हा फोन ड्युअल-सिम कार्डला सपोर्ट करतो. या फोनच्या मागील बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप असून 13 मेगापिक्सलचा प्रायमरी तर, 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आहे. याशिवाय सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. कॅमेऱ्यात AI ब्यूटी, फिल्टर मोड, एचडीआर, पोर्ट्रेट मोड आणि टाइमलॅप्स यांसारखे अनेक फीचर्स आहेत. तसेच, फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4जी एलटीई, वाय-फाय 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, माइक्रो-यूएसबी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक यांसारखे पर्याय आहेत. 29 जिलै रोजी हा सेल पुन्हा एकदा फ्लॅश सेलमध्ये उपलब्ध असणार आहे.

Realme C11 किंमत : 

रिअलमी सी11 या नवीन फोनची किंमत 7,499 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हा फोन रिच ग्रीन व रिच ग्रे अशा दोन कलरमध्ये उपलब्ध असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 3:16 pm

Web Title: realme c11 first sale in india over 150k units sold in just 2 minutes sas 89
Next Stories
1 PUBG Mobile Lite ला झालं एक वर्ष, नवीन बंदुकांसह मॅपही झाला अपडेट
2 NPCI ने लाँच केलं UPI AutoPay फीचर, दर महिन्याला आपोआप होणार पेमेंट
3 Google चा मोठा निर्णय! ‘या’ स्मार्टफोन्सना नाही मिळणार Android 11 चा सपोर्ट
Just Now!
X