News Flash

कसा आहे सॅमसंगचा लेटेस्ट Galaxy A21s ?,’रेडमी नोट 9 प्रो’ला देणार टक्कर

मिड-रेंज सेगमेंटमध्ये Redmi Note 9 Pro Max आणि Realme 6 Pro ला टक्कर...

सॅमसंगने भारतीय मार्केटमध्ये आपला लेटेस्ट स्मार्टफोन Samsung Galaxy A21s उतरवला आहे. बुधवारी, 17 जूनला कंपनीने हा फोन लाँच केला. सॅमसंगच्या या मिड-रेंज स्मार्टफोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आणि 5,000 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी आहे. किंमत आणि स्पेसिफिकेशन्समुळे या स्मार्टफोनची भारतीय बाजारात Redmi Note 9 Pro Max आणि Realme 6 Pro या फोनसोबत टक्कर असणार हे आता स्पष्ट झालंय. मिड-रेंज सेगमेंटमध्ये हे दोन्ही स्मार्टफोन भारतात लोकप्रिय आहेत.

तिन्ही फोनच्या किंमती:-
16,499 रुपये इतकी या फोनची बेसिक किंमत कंपनीने ठेवली आहे. ही किंमत 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटची आहे. तर, 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 18,499 रुपये आहे. दुसरीकडे, Redmi Note 9 Pro Max च्या 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 16,499 रुपये आहे. या फोनच्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 17,999 आणि 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 19,999 रुपये आहे. दुसरीकडे, Realme 6 Pro च्या बेसिक व्हेरिअंटची किंमत 17,999 रुपये आङे. ही किंमत 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची आहे. तर, 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 18,999 रुपये आणि 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 19,999 रुपये आहे.

स्पेसिफिकेशन्स :-
Samsung Galaxy A21s हा स्मार्टफोन ब्लॅक, व्हाइट आणि ब्लू अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये आला आहे. Galaxy A21s या फोनमध्ये कंपनीने अनेक फीचर्स दिले आहेत. फोनच्या मागील बाजूला 48 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्यासह क्वॉड कॅमेरा म्हणजेच चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. सॅमसंग गॅलेक्सी A21s मध्ये infinity-O डिस्प्ले असून याद्वारे युजर्सना दर्जेदार व्हिजुअल्सचा अनुभव मिळतो. तसेच या फोनमध्ये 5,000 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरीही देण्यात आली आहे. ही बॅटरी 21 तासांचा व्हिडिओ प्ले-बॅक सपोर्ट देते असा कंपनीचा दावा आहे. याशिवाय या फोनमध्ये Exynos 850 चिपसेट असून AI पॉवर्ड गेम बूस्टर 2.0 दिले आहे. यामुळे गेम खेळताना फ्रेम रेट आणि स्टेबिलिटी सुधारण्यास मदत होते, तसेच बॅटरीचाही कमी वापर केला जातो. फोनमध्ये 64GB इंटर्नल स्टोरेज असून 512GB पर्यंत स्टोरेज वाढवता येईल. अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टमवर हा फोन कार्यरत असून फेस रिकग्निशन आणि फिंगरप्रिंट सेंसर हे फीचर्सही फोनमध्ये आहेत. मागील बाजूला क्वॉड कॅमेरा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. तर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेंस आणि 2-2 मेगापिक्सलचे अन्य दोन कॅमेरे आहेत. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूला 13 मेगापिक्सलचा कॅमेराही आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन विक्रीला सुरूवात झाली असून सर्व रिटेल स्टोअर्स, सॅमसंग ओपेरा हाउस, samsung.com आणि प्रमुख ऑनलाइन पोर्टलवर हा फोन उपलब्ध असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 4:14 pm

Web Title: samsung galaxy a21s launched in india for rs 16499 everything to know sas 89
Next Stories
1 जिओसाठी आनंदाची बातमी… पुढील तीन वर्षांत घेणार गरुडझेप; ग्राहकांचा आकडा वाचून व्हाल थक्क
2 Twitter ने आणलं नवं फीचर, आता फक्त बोलून करता येणार ‘ट्विट’
3 ‘बीएसएनएल’ची खास ऑफर, रिचार्ज न करता मिळणार 50 रुपयांचा टॉकटाइम