23 November 2020

News Flash

व्हॉटसअॅपचे नवीन व्हर्जन डाऊनलोड करताय? थांबा, कारण…

सोशल मीडियाचा वापर करताना सावध राहा

प्रातिनिधिक छायाचित्र

जगभरात व्हॉट्सअॅप सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अॅप आहे. यामध्ये भारताचाही वरचाच क्रमांक लागतो. व्हॉटसअॅप अॅप्लिकेशन वापरणे हे सध्या अनेकांसाठी अनिवार्यच झाले आहे. एकमेकांना फोटो, व्हिडीयो किंवा फाईल पाठवणे, लोकेशन शेअर करणे, फोन किंवा व्हिडीयो कॉलिंग करणे अशा अनेक गोष्टी व्हॉट्सअॅपमुळे सहज शक्य झाल्या आहेत. मात्र हॅकींग आणि सायबर गुन्हे याबाबत आपल्याला माहित आहेच. याचाच वापर करुन व्हॉटसअपच्या साह्याने युजर्सची वैयक्तक माहिती शेअर करण्याचे काम सध्या केले जात आहे. गुगल प्ले स्टोअरवर व्हॉट्सअ‍ॅपच्या नावाचा वापर करून एका थर्ड पार्टी अ‍ॅपसोबत वैयक्तिक माहिती शेअर करत आहे.

म्हणजेच थोडक्यात काय तर इंटरनेटवर खोट्या व्हॉट्सअ‍ॅपचा वापर होत आहे. Malwarebytes Lab च्या रीपोर्टनुसार, व्हॉट्स अ‍ॅप प्लस हे अ‍ॅप एपीके फाईलमध्ये इंस्टॉल होते आणि युजर्सची वैयक्तिक माहिती घेते. या अ‍ॅपच्या यूआरएल आणि हॅन्डलसोबत गोल्ड कलरचा लोगो दिसतो. त्यामध्ये ‘Agree and continue’ वर क्लिक केल्यानंतर आऊट ऑफ डेट दाखवले जाते. त्यानंतर अ‍ॅपवर Please go to Google Play Store to download latest version असं लिहलेलं दिसतं. यावर ओके क्लिक केल्यानंतर तुम्ही आपोआप दुसर्‍या वेबसाईटवर जाता. तिथे ‘Watts Plus Plus WhatsApp’ डाऊनलोड करण्यासाठी ही वेबसाईट आहे असे अरबी भाषेत लिहीलेले दिसते. त्यामुळे असे सगळे होत असेल तर सावध राहण्याची आवश्यकता आहे. आता हे अॅप्लिकेशन कशापद्धतीने काम करते याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2018 11:20 am

Web Title: security alert of whatsapp beware of downloading new version of it
Next Stories
1 ठेच्याचा परदेशी भाऊबंद
2 जिओचा क्रिकेट सीझन पॅक: २५१ रूपयांत ५१ दिवसांसाठी १०२ जीबी डेटा
3 अशी घ्या तुमच्या गॉगलची काळजी
Just Now!
X