आपण दिवसाच्या सुरुवातीला काय खातो यावर आपला पूर्ण दिवस अवलंबून असतो. सकाळी सकाळी चुकीचे पदार्थ खाल्ल्यामुळे दिवसभर त्रास होऊ शकतो. सकाळी आवर्जून चांगल्या, पोषक पदार्थासह दिवसाची सुरुवात केल्यास आपल्या आरोग्याला त्याचा फायदा होतो. आजच्या काळात प्रत्येक जण आपल्या फिटनेसकडे लक्ष देत आहे. व्यायामाला उत्तम आहाराची जोडही देऊ पाहत आहे. परंतु अनेकदा आहारात नक्की कोणते पदार्थ खायला हवेत? हे आपल्याला माहीत नसतं. यासाठीच आहार तज्ज्ञ लोव्नीत बत्रा यांनी शेअर केलेल्या मोड आलेल्या पदार्थांची माहिती आणि त्याच्या आपल्या शरीराला होणाऱ्या फायद्याविषयी माहिती पाहुयात.

उच्च-प्रथिने असलेले पदार्थ नाश्त्यासाठी खा !

आहार तज्ज्ञ लोव्नीत बत्रा इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगतात की, “उच्च प्रथिने असणारा नाश्ता स्नायूंच्या आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी मदत करतो. मोड आलेल्या पदार्थांमध्ये उच्च प्रथिने असतात. मोड येण्याच्या प्रक्रियेमुळे पोषक तत्वांचा स्तर वाढतो. मोड आलेल्या पदार्थांमध्ये प्रथिने, मॅग्नेशियम, फॉस्फरस, मॅंगनीज आणि जीवनसत्त्वे अधिक असतात.”

Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स

लोव्नीत बत्रा यांना स्वतःला आधी मोड आलेले पदार्थ खायला आवडत नव्हते असे त्या सांगतात. पण त्यांनी मोड आलेल्या पदार्थांपासून पोळा, टिक्की अशा डीश बनवून खायला सुरुवात केली.

मोड आलेले पदार्थ का खावेत?

  • मोड आलेले पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात चांगली रोगप्रतिकार शक्ती  निर्माण होते. तसेच व्हिटॅमिन सी युक्त मोड आलेले पदार्थ शरीरातील पांढर्‍या रक्त पेशींसाठी शक्तिशाली उत्तेजक बनवतात. हे उत्तेजक रोग आणि संसर्गापासून बचाव करण्यासाठी आवश्यक असतात. उत्तेजक तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.
  • हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की, आपण आपल्या शरीराला काय देत आहोत. आपण जे खातो त्याचं प्रतिबिंब आपल्या त्वचेवर दिसून येतं. म्हणूनच मोड आलेल्या पदार्थांसोबत अन्य पोषणयुक्त आहार घेत राहा.
  • मोड आलेले पदार्थ खाल्ल्यामुळे आपले अन्न अधिक सहज पचविण्यास मदत होते. यामध्ये फायबरचे प्रमाण विशेषत: जास्त असते. हे फायबर मल तयार करण्यास उपयोगी ठरते. आतड्यांच्या आरोग्यासाठीही हे पदार्थ उत्तम आहेत.
  • तुम्हाला फक्त मोड आलेले पदार्थ खाल्ल्यावर खूप जड वाटत असेल तर त्याला उकडून घ्या. आणि त्यात उकडलेला बटाटा आणि तूप घाला.