२०.७ बिलियन युएस डॉलर्सची आर्थिक उलाढाल असलेल्या महिंद्रा समूहातील महिंद्रा लाइफस्पेसेस डेव्हलपर्स लिमिटेड (“महिंद्रा लाइफस्पेसेस”) या स्थावर मालमत्ता व पायाभूत सोयीसुविधा विकास उद्योगातील कंपनीने भारतातील आपले प्रमुख कार्यक्षेत्र म्हणून पुण्यावर लक्ष केंद्रित करण्याची परंपरा कायम राखली आहे. या कंपनीच्या ‘सेन्ट्रलिस’ या मध्यम श्रेणीतील आवास प्रकल्पाला शुभारंभाच्या टप्प्यातच लक्षणीय प्रतिसाद मिळाला आहे. राहण्याच्या दृष्टीने लोकांच्या पसंतीच्या पिंपरी शहरात अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या प्रकल्पाचा एकूण विस्तार ४.५ एकर असून यामध्ये चार टॉवर्समध्ये ४०० पेक्षा जास्त वन बीएचके व टुबीएचके घरे आहेत. ‘सेन्ट्रलिस’मधील घरांचा कार्पेट एरिया ३७.५ चौरस मीटर (४१६.८९ चौरस फीट) ते ५३.४४ चौरस मीटर (५९३.८५ चौरस फीट) आहे व त्यांच्या किमती ४०.५६ लाख रुपयांपासून पुढे आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (“महारेरा”) अंतर्गत नोंदणीकृत आहे.

सेन्ट्रलिस हा महिंद्रा लाइफस्पेसेसचा पुण्यातील पाचवा निवासी प्रकल्प आहे. शैक्षणिक संस्था, हॉटेल्स व रेस्टॉरंट्स, मॉल्स, सिनेमा थिएटर्स या सर्व सोयीसुविधा या प्रकल्पापासून अगदी जवळ आहेत. आपले सर्व निवासी प्रकल्प सामाजिक पायाभूत सोयीसुविधांनी परिपूर्ण असावेत हा कंपनीचा दृष्टिकोन असतो. त्याचप्रमाणे मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, पीसीएमसी लिंक रोड, उत्तम बस सेवा, पिंपरी व चिंचवड रेल्वे स्थानके व पुणे विमानतळ यांच्याशी हा प्रकल्प अगदी सोयीस्कररीत्या जोडला गेलेला आहे. प्रस्तावित पिंपरी मेट्रो स्टेशन हे या प्रकल्पापासून फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर आहे.

भारतात पर्यावरणाला अनुकूल, शाश्वत शहरीकरणाला प्रोत्साहन देणारी, आपले सर्वांचे आरोग्य व कल्याण यांचे हित जपणारी हरित घरे विकसित केली जावीत हा महिंद्रा लाइफस्पेसेसचा मुख्य उद्देश आहे. भरपूर सूर्यप्रकाश व खेळती हवा प्रत्येक घराला मिळावी यासाठी सेन्ट्रलिसची रचना एल आकारात करण्यात आली आहे. ऊर्जा बचत करणाऱ्या भिंती व छत, कृत्रिम लायटिंग डिझाईन, सौर उर्जेवर पाणी तापविण्याची सुविधा उपलब्ध करवून देऊन सुविधांचा खर्च कमी केला आहे. त्याचप्रमाणे घरातील हवा शुद्ध राहावी यासाठी लो-व्हीओसी रंग, बागा सुशोभित करण्यासाठी कचरा प्रक्रिया, पावसाचे पाणी साठवण्याची सुविधा, प्रत्येक स्तरावर कचरा वर्गीकरण या इतर सुविधाही याठिकाणी आहेत. सेन्ट्रलिसला ग्रीन रेटिंग फॉर इंटीग्रेटेड हॅबिटॅट असेसमेंट यांचे फोर स्टार प्रमाणपत्र मिळाले असून याठिकाणी ग्राहकांना तुलनेने कमी देखभाल खर्चाचे लाभ मिळतील.

महिंद्रा लाइफस्पेसेस पुण्यामध्ये २००७ पासून कार्यरत आहे. आजतागायत त्यांनी २.८७ मिलियन चौरस फीट जागेचा विकास केला आहे. त्यांच्या आधीच्या प्रकल्पांमध्ये पिंपरी-चिंचवड येथे ‘महिंद्रा रॉयल’, वाकडमध्ये ‘द वुड्स’ सोपानबाग येथे ‘ला आर्टिस्ट’ यांचा समावेश असून ते पूर्णपणे विकले गेले आहेत. पिंपरी येथील त्यांचा अजून एक प्रकल्प ‘अँथेईआ’ लवकरच पूर्ण होईल, याठिकाणी १००० घरांचा ताबा देऊन झाला आहे.