देशातील दिग्गज ऑटोमोबाइल कंपनी Tata Motors ने भारतीय बाजारामध्ये आपल्या गाड्यांची विक्री वाढवण्यासाठी एक नवी योजना बनवली आहे. कंपनीने घरगुती बाजारात 10 टक्के विक्रीचं लक्ष्य निश्चित केलं असून त्यासाठी ही नवी योजना बनवली आहे.

नव्या योजनेअंतर्गत आपला विस्तार वाढवण्यासाठी Tata Motors कडून छोट्या शहरांमध्ये नवीन डिलर्स तयार केले जाणार आहेत. पण, यामध्ये विशेष बाब म्हणजे कंपनीकडून इंधन विक्रेत्यांसोबत ( oil marketing companies) भागीदारी करण्यावर जोर दिला जात आहे. छोट्या शहरांतील पेट्रोल पंपांवर गाड्यांचं सादरीकरण करुन तेथूनच विक्री करण्याची योजना आहे. Economictimes च्या रिपोर्टनुसार, Tata Motors चे मार्केटिंग प्रमुख (प्रवासी वाहन) विवेक श्रीवास्तव यांनी या योजनेला प्रायोगिक तत्वावर ‘इमर्जिंग मार्केट आउटलेट’ नाव दिलं जाऊ शकतं असं म्हटलंय.

आणखी वाचा – (किंमत फक्त…, शानदार ‘स्पोर्टी लुक’मध्ये लाँच झाली Maruti Ignis)

आणखी वाचा – (स्टॉक संपवण्यासाठी TATA च्या गाड्यांवर ‘बंपर’ डिस्काउंट)

आणखी वाचा – (Maruti चा धमाका, फक्त 11 हजारांत बुक करा नवीन Brezza)

“पेट्रोल पंपावरील कंपनीच्या शोरुममध्ये एक-दोन छोट्या किंवा लोकप्रिय कार डिस्प्लेसाठी ठेवल्या जातील. पेट्रोल पंपाच्या आकारवर कारची संख्या ठरवली जाईल. Tata Tiago ही कारचा ग्राहकाला केवळ तिच कार बघायला आवडेल, त्याला अन्य पाच तकार बघण्यात काहीच रस नसतो. छोट्या शहरांमध्ये मोठे शोरुम उभारणं मोठी समस्या आहे त्यामुळे केवळ ठाराविक गाड्याच शोकेससाठी ठेवल्या जातील. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 400 शोरूम तयार झाले आहेत. आता दरवर्षी अशाप्रकारे 100 आउटलेट उभारणं कंपनीचं लक्ष्य आहे”, अशी माहिती श्रीवास्तव यांनी दिली.

आणखी वाचा – (मारुतीची ‘रावडी’ SUV! पहिली झलक दिसताच चर्चांना उधाण)

आणखी वाचा – (मारुतीची ‘रावडी’ SUV! पहिली झलक दिसताच चर्चांना उधाण)

आणखी वाचा -(Mahindra चा जलवा! सिंगल चार्जमध्ये तब्बल 520 Km धावणार , 5 सेकंदात 100 चा स्पीड)

मोठ्या शहरांमध्ये कार शोरूम बनवण्यासाठी जवळपास 30 कोटी रुपये लागतात. तर, छोट्या शहरांमध्ये पेट्रोल पंपावर शोरुम बनवण्यासाठी कमी खर्च लागेल आणि डिलर्सनाही कमी गुंतवणूक करावी लागेल. अन्य काही ऑटोमोबाइल कंपन्यांनीही छोट्या डिलरशिपचा प्रयोग सुरू केला आहे पण, अद्याप कोणीही पेट्रोल पंपांसोबतच्या कराराबाबत घोषणा केलेली नाही.

आणखी वाचा -(देशातील 10 सर्वाधिक Popular Cars , ‘ही’ ठरली बेस्ट ; बघा संपूर्ण यादी)