19 November 2019

News Flash

अचूक प्रतिमांसाठी भिंगरहित त्रिमितीय एण्डोस्कोप

हा एण्डोस्कोप ऑप्टोजेनेटिक्सच्या अभ्यासकांना विशेष उपयुक्त ठरणार आहे.

एखाद्या पेशीपेक्षाही लहान असलेल्या घटकाच्या त्रिमितीय प्रतिमा मिळवू शकेल, असा भिंगरहित आणि स्वत:हून अचूकतेने काम करू शकणारा नवा एण्डोस्कोप शास्त्रज्ञांनी विकसित केला आहे. कोणत्याही प्रकारचे भिंग किंवा तत्सम दृष्टीदायक, विद्युतीय किंवा यांत्रिक भाग नसलेल्या या एण्डोस्कोपच्या टोकाद्वारे सुमारे २०० इतक्या भागाचे दृश्य मिळू शकते, असे संशोधकांनी सांगितले.

शरीराच्या भागावर कमीत कमी छेद घेऊन आतील उतींच्या प्रतिमा घेण्याचे साधन असलेल्या या अत्यंत चपटय़ा आकाराच्या एण्डोस्कोपद्वारे अनेक प्रकारचे उपचार करण्याबरोबरच तो संशोधनासाठीही उपयुक्त ठरणार आहे, असा दावा या संशोधकांनी केला आहे.

याबाबत जर्मनीतील ड्रेसडेन तंत्रज्ञान विद्यापीठातील ज्युरजेन डब्लू. झास्र्के यांनी सांगितले की, ‘‘हा भिंगविरहित एण्डोस्कोप फायबरपासून बनविला असून त्याचा आकार एखाद्या सुईएवढा आहे. तो शरीराच्या आत घालण्यासाठी कमीत कमी आकाराचा छेद करावा लागतो. त्याचे फायबर अगदी थोडे जरी वाकले तरी ते पूर्ववत केले जाते. यातून अत्यंत उच्च दर्जाची प्रतिमा मिळते.’’

हा एण्डोस्कोप ऑप्टोजेनेटिक्सच्या अभ्यासकांना विशेष उपयुक्त ठरणार आहे. या शाखेत पेशींमधील क्रियांना चालना देण्यासाठी प्रकाशाचा वापर केला जातो. पारंपरिक एण्डोस्कोपमध्ये शरीरातील प्रतिमा मिळविण्यासाठी कॅमेरा आणि प्रकाशाचा वापर केला जातो. अलीकडील काळात अशा प्रतिमा मिळविण्यासाठी ऑप्टिकल फायबरचा वापर केला जात आहे. त्यामुळे तुलनेत मोठे कॅमेरे आणि इतर मोठी साधने वापरण्याची गरज उरली नाही. पण, अशा तंत्रांमध्ये बदलत्या तापमानाशी जुळवून घेता न येणे, फायबर वाकणे किंवा गुंडाळला जाणे आदी समस्या येत होत्या.

First Published on August 17, 2019 11:55 pm

Web Title: three dimensional endoscopy mpg 94
Just Now!
X