टीव्हीएस मोटर कंपनीने आपल्या स्टायलिश 110 सीसीच्या मोटरसायकल ब्रँड ‘टीव्हीएस स्टार सिटी प्लस’साठी विशेष आवृत्ती लाँच केली आहे. 54 हजार 579 रुपये इतकी या स्पेशल एडिशनची एक्स-शोरुम किंमत आहे. सणासुदीच्या निमित्ताने खास तयार करण्यात आलेल्या या स्पेशल एडिशनमध्ये सफेद-काळ्या रंगांचे ड्युअल टोन आहेत. या एडिशनची किंमत अन्य सामान्य मॉडलपेक्षा 1500 रुपये अधिक आहे.

TVS Star City Plus मध्ये सिंक्रोनाइज्ड ब्रेकिंग टेक्नॉलॉजीचा (एसबीटी) वापर करण्यात आला आहे. कंबाइन्ड ब्रेक सिस्टिमचं हे टीव्हीएस व्हर्जन आहे. ही सिस्टिम पुढील आणि मागील दोन्ही बाजूंना वापरण्यात आली आहे. ऑटोमॅटिक हेडलाईट ऑन (एएचओ) आणि या श्रेणीतील सर्वोत्तम वैशिष्ट्यांनी परिपूर्ण टीव्हीएस स्टार सिटी+ मध्ये शानदार हनीकोम्ब टेक्श्चर्ड साईड पॅनेल ग्रिल्स आहेत, ज्यामुळे गाडीचा प्रभाव कायम राखला गेला असून स्टायलिंग अधिक जास्त वाढली आहे.

राईड आणि गाडी हाताळणीचा सर्वोत्तम अनुभव मिळत रहावा यासही टीव्हीएस स्टार सिटी+ मध्ये टेलिस्कोपिक फ्रंट शॉक ऍब्जॉर्बर्स आणि पाच स्टेप अॅड्जस्टेबल रिअर शॉक अॅब्जॉबर्स आहेत. हाय ग्रीपबटन टाईपट्यूबलेस टायर्स यामुळे रस्ता आणि टायर सतत एकमेकांच्या संपर्कात राहतात आणि गाडी घसरण्याचा धोका कमी होतो. यामध्ये ईकोथ्रस्ट इंजिन वापरण्यात आलं आहे. हे इंजिन 8.4hp ची ऊर्जा आणि 8.7Nm टॉर्क निर्माण करतं. यामध्ये 4-स्पीड गिअरबॉक्स आहे. पॅडेड ड्युअल टोन सीट दर्जेदार मटेरिअलपासून बनवण्यात आलं आहे. यामुळे लांबच्या प्रवासातही हे सीट त्रासदायक ठरत नाही, तसेच  सॉफ्ट टच प्रीमियम स्विच गिअरमुळे आरामदायी प्रवासात अधिकच भर पडते असा कंपनीचा दावा आहे.