टायफॉइडच्या लसीमुळे संसर्ग दरात निम्म्याने घट होत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात स्पष्ट झाले आहे. भारतात दोन वर्षांच्या आतील लहान मुलांना ही लस दिली जाते.

हे संशोधन नुकतेच ‘द लँकेट जर्नल’मध्ये प्रसिद्ध झाले आहे. ११२ प्रौढ व्यक्तींची तपासणी केल्यानंतर टायफॉइडची लस सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले. या संशोधनातून मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन वर्षांच्या आतील बालकांसाठी ही लस सुरक्षित ठरेल, असा निष्कर्ष काढण्यात आला. या लसीचा प्राथमिक प्रयोग आरोग्य स्वयंसेवकांवर केला जातो. या संशोधनाचा अभ्यासकांनी पुरस्कार केला असून त्यामुळे विविध लसींचा शोध वेगाने लागू शकतो, असेही संशोधकांचे मत आहे. व्ही-कॉन्जुगेट लस केवळ संशोधनासाठी देण्यात येते. भारतात दोन वर्षांच्या आतील मुलांना ही लस देण्यात येते. जगभरातील लहान मुलांना ही लस देण्यासाठी कोणताही परवाना देण्यात आलेला नसून तो भारताला देण्यात आला आहे. टायफॉइडचा ताप घालविण्यासाठी ही लस अत्यंत प्रभावी असल्याचे संशोधक सांगतात.

Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
150 scrap godowns burnt down in Pimpri-Chinchwad
पिंपरी- चिंचवडमध्ये दिडशे भंगार गोडाऊन जळून खाक; १८ तासानंतरही धुमसतेय आग
Hardik Malinga Pushing Video Viral
MI vs SRH : हार्दिक पंड्याने लसिथ मलिंगाला ढकलल्याने चाहते संतापले, VIDEO होतोय व्हायरल

जगभरातील १२.५ ते २०.६ दशलक्ष लोकांना टायफॉइडचा संसर्ग होतो. अशुद्ध पाणी आणि अस्वच्छता यांमुळे टायफॉइडचा संसर्ग होतो. १०० पैकी एकाचा टायफॉइडमुळे मृत्यू होतो.