Vivo कंपनीने सोमवारी भारतात आपला नवीन स्मार्टफोन Vivo Y51 लाँच केला. हा स्मार्टफोन कंपनीने गेल्या आठवड्यातच इंडोनेशियामध्ये लाँच केला होता. कंपनीच्या या लेटेस्ट फोनमध्ये 8GB रॅम व 128GB इनबिल्ट स्टोरेज आहे. 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या या फोनमध्ये 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरीही मिळेल. जाणून घेऊया व्हिवोच्या या फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत :-

Vivo Y51: किंमत आणि उपलब्धता :-
Vivo Y51 या स्मार्टफोनची किंमत भारतात 17 हजार 990 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हा फोन टायटेनियम सफायर आणि क्रिस्टल सिंफनी अशा दोन कलर्सच्या पर्यायांत उपलब्ध असेल. ‘मेक इन इंडिया’अंतर्गत या फोनचं ग्रेटर नोयडाच्या प्रकल्पात उत्पादन घेण्यात आल्याचं कंपनीकडून यावेळी सांगण्यात आलं. यासोबतच कंपनीने आपला Vivo Y 30 अपग्रेडेड व्हेरिअंट 14,990 रुपयांमध्ये उपलब्ध करण्याची घोषणाही केली आहे. आता हा फोन 6GB रॅमसोबतही खरेदी करता येईल. यापूर्वी हा फोन केवळ 4GB रॅम आणि 128GB इनबिल्ट स्टोरेजमध्येच उपलब्ध होता.

Realme P1 Realme P1 Pro martphones will be available for purchase with Bank offers discounts and more
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्ट; रिअलमीच्या ‘या’ बजेट फ्रेंडली फोनची आज पहिली विक्री, जाणून घ्या आकर्षक सवलती
Samsung launched on Friday a new variant of its popular budget F15 smartphone Here is all the details
२० हजारांपेक्षा कमी किमतीत सॅमसंगचा ट्रिपल कॅमेरा सेटअपचा स्मार्टफोन; बॅटरी लाईफ बघून म्हणाल ‘डील Done’
Motorola launches Edge 50
बाकी कंपन्यांची उडाली झोप, मोटोरोलाचा जबरदस्त डिस्प्लेसह स्मार्टफोन देशात दाखल, मिळताहेत भरमसाठ ऑफर्स
Job Opportunity Recruitment at AI Airport Services Limited
नोकरीची संधी: एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये पदभरती

Vivo Y51: स्पेसिफिकेशन्स :-
या फोनमध्ये 6.58 इंचाचा फुल एचडी+ हॅलो फुलव्ह्यू एलसीडी डिस्प्ले आहे. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर, 8GB रॅम आणि128GB इनबिल्ट स्टोरेज फोनमध्ये आहे. स्टोरेज माइक्रोएसडी कार्डद्वारे 1 टीबीपर्यंत वाढवता येणंही शक्य आहे. याशिवाय हा फोन अँड्रॉइड 11 वर आधारित फनटच ओएस 11 वर कार्यरत असेल. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 48 मेगापिक्सेल प्रायमरी, 8 मेगापिक्सेल आणि 2 मेगापिक्सेलचे तीन सेन्सर आहेत. तर, सेल्फिसाठी यात 16 मेगापिक्सेलचा फ्रंट सेन्सरही आहे. कॅमेऱ्यासाठी पोर्ट्रेट, पॅनोरमा, लाइव्ह फोटो, स्लो-मोशन, टाइम-लॅप्स आणि अन्य मोडही आहेत. फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5000 mAh क्षमतेची दमदार बॅटरी फोनमध्ये आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही बॅटरी 14.3 तास ऑनलाइन एचडी मूव्ही स्ट्रीमिंग आणि 7.26 तासांपर्यंत गेमिंग बॅकअप देते. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4जी व्हीओएलटीई, ब्लूटूथ 5.0 आणि युएसबी टाइप-सी यांसारखे फिचर्स आहेत.याशिवाय फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सरही आहे.