Vivo कंपनीने भारतात आपला नवा स्मार्टफोन Z1 Pro लाँच केला आहे. 11 जुलैपासून हा स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावरुन विक्रिसाठी उपलब्ध केला जाईल. सोनिक ब्ल्यू, सोनिक ब्लॅक आणि मिरर ब्लॅक अशा तीन रंगाचे पर्याय या फोनसाठी देण्यात आले आहेत. मल्टिटास्किंगमध्ये अर्थात एकाच वेळी अनेक अॅप्लिकेशनचा वापर करण्यात हा फोन अग्रेसर असेल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम+64 जीबी स्टोरेज, 6 जीबी रॅम+64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम+128 जीबी स्टोरेज अशा तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. अनुक्रमे 14 हजार 990 रुपये, 16 हजार 990 रुपये आणि 17 हजार 990 रुपये इतकी या स्मार्टफोनची किंमत ठेवण्यात आली आहे. 11 जुलैपासून हे सर्व व्हेरिअंटस् फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलसह विवोच्या स्टोअरवरून खरेदी करता येणार आहे.

Vivo Z1 Pro स्मार्टफोनमध्ये पंच होल कॅमेऱ्यासह 6.53 इंचाचा IPS LCD FHD+ डिस्प्ले आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन एसडी 712 प्रोसेसर असून  डेडिकेटेड AI बटण आहे.  स्मार्टफोनच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यातील 16 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 8 व 2 मेगापिक्सलचे अन्य कॅमेरे आहेत. याशिवाय सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा अंडर-डिस्प्ले कॅमेरा देण्यात आला असून याला पंच होल डिस्प्लेच्या डिझाईनमध्ये फिट करण्यात आलेले आहे. कॅमेऱ्याद्वारे दर्जेदार प्रतिमा घेता येणार असून यात फोर-के व्हिडीओचा सपोर्टही दिलेला आहे.  यात फास्ट चार्जींगच्या सपोर्टसह तब्बल 5 हजार मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइड पाय या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा फनटच ओएस 9 हा युजर इंटरफेस दिलेला आहे.