News Flash

WhatsApp च्या नवीन अटी स्वीकारा, नाहीतर अकाउंट Delete करा !

WhatsApp युजर्ससाठी महत्त्वाचं वृत्त, पुढील वर्षापासून कंपनीची नवीन प्रायव्हसी पॉलिसी न स्वीकारणाऱ्या युजर्सना...

(फोटो क्रेडिट - Pixabay)

लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp युजर्ससाठी महत्त्वाचं वृत्त आहे. पुढील वर्षापासून कंपनीची नवीन प्रायव्हसी पॉलिसी न स्वीकारणाऱ्या युजर्सना आपल्या WhatsApp अकाउंटचा अ‍ॅक्सेस मिळणार नाही. म्हणजेच WhatsApp चा वापर करण्यासाठी तुम्हाला कंपनीच्या अटी स्वीकारणं अनिवार्य असेल.

नवीन अटींबाबत अद्याप व्हॉट्सअ‍ॅपकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण व्हॉट्सअ‍ॅपबाबतचे सर्व अपडेट्स ट्रॅक करणाऱ्या WABetaInfo ने याबाबतची माहिती दिली आहे. WABetaInfo ने व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन अटींचा ( प्रायव्हसी पॉलिसी) एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. जर आमच्या अटी स्वीकारायच्या नसतील तर युजर्स त्यांचं WhatsApp अकाउंट डिलीट करु शकतात, असं या स्क्रीनशॉटमध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे. WhatsApp ची नवीन प्रायव्हसी पॉलिसी 8 फेब्रुवारी 2021 पासून लागू होणार आहे. याशिवाय, The Independent च्या रिपोर्टमध्येही 8 फेब्रुवारीपासून व्हॉटसअ‍ॅपचा वापर करण्यासाठी युजर्सना कंपनीची नवीन पॉलिसी स्वीकारावीच लागेल, अन्यथा त्यांना अकाउंटचा वापर करता येणार नाही, असं म्हटलंय.

(फोटो क्रेडिट: WABetaInfo)

WABetaInfo ने आपल्या रिपोर्टमध्ये असंही म्हटलंय की, व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन अटींमध्ये नववर्षात युजर्सच्या डेटाचा वापर कशाप्रकारे केला जाईल याचीही माहिती देण्यात आली आहे. याशिवाय फेसबुक बिजनेससाठी तुमची चॅट कशाप्रकारे मॅनेज केली जाईल याबाबतही माहिती देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 11:30 am

Web Title: whatsapp users to accept new privacy policy or delete account says report sas 89
Next Stories
1 २०२०चे धनी!
2 थंडीच्या दिवसात गाजर खाण्याचे आहेत ‘हे’ फायदे
3 व्होडाफोन-आयडिया युजर्सना झटका, महाग झाले दोन ‘पॉप्युलर’ प्लॅन्स
Just Now!
X