वजन कमी होण्यासाठी स्त्रियांच्या बाबतीत प्रेमभंग कारणीभूत ठरू शकतो. जोडीदाराकडून नाकारले गेल्यानंतर स्त्रियांच्या वजनात सरासरी दोन किलोची घट होत असल्याचे अलीकडेच एका संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहे. अनेक वर्षांचे एखादे नाते तुटल्यानंतर एका वर्षापेक्षा जास्त काळ ‘एकटे’ राहिल्यास स्त्रियांचे वजन तब्बल सहा किलोपर्यंत कमी होऊ शकते. प्रेमभंगानंतर होणारी भावनिक उलथापालथ कमी प्रमाणात भूक लागण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे ४६ टक्के लोकांनी ‘डेली एक्स्प्रेस’ने नोंदविलेल्या अहवालात सांगितले आहे. तर ४७ टक्के लोकांनी प्रेमभंगाच्या घटनेनंतर अधिक आकर्षक दिसण्यासाठी आपणहून वजन घटवल्याचे म्हटले आहे. अन्य एका सर्वेक्षणात प्रेमाच्या नात्यात नसताना अनेकांचा आपल्या बारीक दिसण्याकडे जास्त कल असल्याचे दिसून आले आहे. तर दुसरीकडे ६८ टक्के लोकांनी जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध संपुष्टात आल्यावर वजनाचे प्रमाण कमी झाल्याचे सांगितले. जोडीदारांपैकी कुणाकडून नातेसंबंध संपवण्यात आले, हा घटकसुद्धा वजन कमी होण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतो. जोडीदाराकडून नाकारल्या जाणा-या स्त्रियांच्या तुलनेत स्वत:हून नाते संपवणा-या स्त्रियांच्या बाबतीत वजन घटण्याचे प्रमाण अर्ध्याने कमी असल्याचे समोर आले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 5, 2014 12:24 pm