रेडमी नोट ३ च्या यशानंतर ‘शिओमी’ने काही महिन्यांपूर्वीच रेडमी नोट फोर लाँच केला होता. स्वस्त, सुंदर, टिकाऊ या तीन गुणांमुळे या फोनला भारतीय बाजारपेठेत तुफान प्रसिद्धी लाभली. हा फोन खरेदी करायचा झालाच तर अनेकदा ‘ऑउट ऑफ स्टॉक’ असा मेसेज स्क्रिनवर दिसतो. पण जर तुम्हाला हा फोन खरेदी करायचा आहे तर आज चांगली संधी आहे. कारण फ्लिपकार्टवर आज दुपारी बारा वाजल्यापासून या फोनवर वेगवेगळ्या ऑफर्स असणार आहे. ज्यात एका ऑफरनुसार तुम्ही हा फोन फक्त ९९९ रुपयांना देखील खरेदी करू शकता. इएमआय, एक्सचेंज आणि बायबॅक अशा वेगवेगळ्या ऑफर्स या फोनवर देण्यात आल्यात.

रेडमी नोट ४ वर पहिल्यांदाच फिल्पकार्टने १२ हजार रुपयांपर्यंतची एक्स्चेंज ऑफर दिलीये. म्हणजेच एखाद्या ग्राहकाला या ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास हा फोन ते फक्त ९९९ रुपयांतही खरेदी करू शकतात. याशिवाय बायबॅक गॅरंटीही देण्यासाठी आली आहे पण याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना २४९ रुपये जास्त द्यावे लागतील.

५.५ इंचांचा फुल एचडी डिस्प्ले असलेला हा फोन २GB/३२GB रॅम, ३GB/३२GB, ४GB/६४GB अशा तीन प्रकारात उपलब्ध आहे.
– २GB/३२GB रॅम फोनवर ४ हजार रुपयांची बायबॅक गॅरंटी देण्यात आली
– ३GB/३२GB रॅम फोनवर ४, ५०० रुपयांची बायबॅक गॅरंटी देण्यात आली
– ४GB/६४GB रॅम फोनवर ५, २०० रुपयांची बायबॅक गॅरंटी देण्यात आली
– या व्यतिरिक्त रेडमी नोट ४ खरेदी केल्यानंतर Mi2 एअर प्युरिफायरवर ग्राहकांना ५०० रुपयांची अतिरिक्त सूट मिळणार आहे.

शिओमीने रेडमी नोट ४ मध्ये स्नॅपड्रॅगॉनचा ६२५ ऑक्टा कोर हा प्रोसेसर आणि अड्रिनो ५०६ हा जीपीयू वापरला आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाइलमधील गेम्स अधिक चांगल्या प्रकारे आणि विनाअडथळा खेळू शकता तसेच नेहमीच्या वापरातील लहान, मोठे अ‍ॅपसुद्धा सहज वापरू शकता. या प्रोसेसरचे वैशिष्टय़ असे की हा खूप कमी वीज वापरतो, ज्यामुळे कमी बॅटरीचा उपयोग होतो आणि तुम्ही तुमच्या मोबाइलचा वापर अधिक काळ करू शकता. शिवाय यात ४१०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, त्यामुळे एकदा मोबाइल चार्ज केल्यानंतर एक ते दीड दिवस सहज वापरू शकता. ‘रेडमी नोट फोर’मध्ये दोन सिमकार्डची सुविधा आहे. परंतु एका वेळी दोन सिम कार्ड किंवा एक सिम कार्ड आणि एक मेमरी कार्ड वापरू शकता. यात तुम्ही मेमरी कार्डच्या साह्याने स्टोरेज १२८ जीबीपर्यंत वाढवू शकता. ‘रेडमी नोट फोर’मधे मागील बाजूस १३ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे.