News Flash

flashback 2018 : ‘हे’ आहेत वर्षभरातील स्वस्तात मस्त स्मार्टफोन

सामन्यांच्या खिशाला परवडणऱ्या स्मार्टफोनने बाजारावर आपली छाप सोडली.

सरत्या वर्षात अनेक नव-नवीन स्मार्टफोनने लोकांच्या मनावर गारूड घातले. शाओमी रेडमी नोट ६ प्रो पासून मोटो वन पर्यंत अनेक स्मार्टफोन या वर्षात बाजारात आले. यापैकी काही मोजक्याच मिड रेंज स्मार्टफोनचा बाजारात बोलबाला पाहायला मिळला. यावेळी सामन्यांच्या खिशाला परवडणऱ्या स्मार्टफोनने बाजारावर आपली छाप सोडली.

१ – आसुस जेनफोन मॅक्स प्रो एम ३ : आसुस कंपनीने नुकतेच जेनफोन मॅक्स प्रो एम २ स्मार्टफोन बाजारात आणले आहे. यामध्ये ६६० स्नॅपड्रॅगन ६६० प्रोसेसर, ६ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. याशिवाय ५००० एमएएचची शक्तीशाली बॅटरी देण्यात आली आहे. स्मार्टफोनमध्ये गोरिल्ला ग्लास ६ प्रोटेक्शन देखील आहे. १२ मेगापिक्सल व ५ मेगापिक्सल डुअल रिअर कॅमेरा व १३ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सर्वसमावेश अशा या स्मार्टफोनची किंमत १६,९९९ रुपये इतकी आहे.

२ – हॉनर प्ले : बाजारात आलेला हॉनर प्ले स्मार्टफोन देखील लोकांच्या पसंतीवर खरा उतरत आहे. किरीन ९७० प्रोसेसरवर चालणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. मोबाईलला ३७५० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. ६.३ इंचच्या नॉच डिस्प्लेसोबत येणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत १६,९९९ रुपये आहे.

३ – रियलमी २ प्रो : ३५०० एमएएच बॅटरी व ८ जीबी रॅम सोबत येणाऱ्या रियलमी २ प्रो ची देखील बाजारात चांगलीच मागणी आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६६० प्रोसेसर देण्यात आले आहे. १६ मेगापिक्सल व २ मेगापिक्सल डुअर व १६ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनची किंमत १३,९९० रुपये इतकी आहे.

४ – वीवो व्ही ९ प्रो : या स्मार्टफोनमध्ये ६ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. ३२६० एमएएचची बॅटरी व ६.३ इंचाचा नॉच डिस्प्ले या फोनला देण्यात आला आहे. कंपनीने फ्रंट १६ मेगापिक्सल आणि १३ प्लस २ मेगापिक्सलचा डुअल रिअर कॅमेरा दिला आहे. कंपनीने या मोबाईलची किंमत १७, ९९० इतकी ठेवली आहे.

५ – शाओमी रेडमी नोट ६ प्रो : शाओमीचे स्मार्टफोन चालू वर्षात सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहेत. कमी किंमत व भरपूर फिचर मुळे लोकांना हा मोबाईल पसंद पडल्याचे दिसून येत आहे. रेडमी नोट ६ प्रोला ६.२६ इंचाचा मोठा नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. ४००० एमएएच बॅटरी व स्नॅपड्रॅगन ६३६ प्रोसेसर सोबत येणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये ६ जीबी रॅम व ४ जीबी रॅम असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. १२ मेगापिक्सल व ५ मेगापिक्सल डुअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. २० मेगापिक्सल व २ मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरासोबत येणाऱ्या स्मार्टफोनची किंमत १५,९९९ इतकी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2018 10:24 am

Web Title: xiaomi redmi note 6 pro asus realme 2 pro honor play moto one top 6 mid range smartphone launch in 2018
Next Stories
1 सिगारेटसोबत मद्य सोडणेही सोपे!
2 ३९९ रुपयांच्या प्लॅनवर रिलायन्स जिओ देणार १००% कॅशबॅक
3 एयरटेलच्या ४४८ रुपयांच्या प्लॅनमध्ये बदल
Just Now!
X