Home Remedy Rid Termites Or Deemak Wooden Furniture : घरातील जुनं फर्निचर, दरवाज्यांना अचानक वाळवी लागते. ही वाळवी एवढी भयानक असते की, पूर्ण लाकडी फर्निचर पोखरुन त्याचे नुकसान करते. वाळवी लाकडी फर्निचर काही दिवसांत आतून इतके पोकळं करते की, शेवटी ते घरातून काढून फेकून देण्याशिवाय पर्याय उतर नाही, अशावेळी ही वाळवी वेळीच रोखली नाही तर घरभर पसरण्याची भीती असते. पण आज आपण अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही घरात कितीही जुनं लाकडी फर्निचर असू द्या, त्यांचे वाळवीपासून चांगल्याप्रकारे संरक्षण करु शकता, किंवा ते फर्निचर वाळवीपासून मुक्त करु शकता.
लाकडी फर्निचरला वाळवी लागू नये यासाठी सोप्या टिप्स (How To Protect Wooden Furniture From Termites)
१) कडुलिंबाचे तेल
लाकडी वस्तूंना लागलेली वाळवी रोखायची असेल तर तुम्ही कडुलिंबाचे तेल वापरु शकता. लाकडी फर्निचरवर ज्या ठिकाणी वाळवी लागली असेल त्या ठिकाणी कडुलिंबाचे तेल योग्यरित्या लावावे. तुम्ही हे तेल बाटलीमध्ये भरुन फर्निचरवर स्प्रे देखील करु शकता. कडुलिंबाच्या तेलात अँटी बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात ज्यामुळे वाळवी नाहीशी होते.
२) मीठ
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, पण फर्निचर वाळवी मुक्त करण्यासाठी तुम्ही मीठ देखील वापरू शकता. मिठात थोडे पाणी किंवा लिंबाचा रस मिसळा आणि त्याचे जाडसर द्रावण तयार करुन लाकडी वस्तूंवर कापसाच्या बोळ्याने लावा, असे महिन्यातून काही दिवस रोज करा, अशाने फर्निचरवरील वाळवी मोठ्या प्रमाणात कमी होईल.
३) लवंगाचे तेल
घरातील लाकडी फर्निचरवरील वाळवी घालवण्यासाठी तुम्ही लवंग तेल देखील वापरू शकता. ते वापरणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्ही एका कप पाण्यात १० थेंब लवंग तेल टाका. आता हे तयार द्रावण फर्निचरवर वाळवी लागलेल्या ठिकाणी लावा, असे काही दिवस केल्यास फर्निचरवरील वाळवी नाहीशी होऊ शकेल.
४) व्हिनेगर आणि लिंबाचा रस
घरातील फर्निचरला वाळवी लागू नये यासाठी व्हिनेगर आणि लिंबाचा रस हा देखील एक चांगला उपाय आहे. यासाठी एका स्प्रे बाटलीत व्हिनेगर आणि लिंबाचा रस समप्रमाणात घ्या, आता ते फर्निचरवर स्प्रे करा, यामुळे वाळवीचे प्रमाण कमी होईल.