scorecardresearch

Amazon Great Republic Day Sale 2022: आज ऑफरचा शेवटचा दिवस, मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठी सूट

अ‍ॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल २०२२ चा आज शेवटचा दिवस आहे.

amazon-9-620x400
Amazon Great Republic Day Sale 2022: आज ऑफरचा शेवटचा दिवस, मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठी सूट

अ‍ॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल २०२२ चा आज शेवटचा दिवस आहे. प्रजासत्ताक दिन विशेष विक्री आज मध्यरात्री संपणार आहे. अ‍ॅमेझॉनची वर्षातील पहिली मोठी विक्री या आठवड्याच्या सुरुवातीला शेकडो डीलसह सुरू झाली होती. आम्ही काही सर्वोत्तम वस्तू आणि ऑफर निवडल्या आहेत ज्या विक्रीच्या शेवटच्या दिवशी उपलब्ध आहेत. तुम्ही अ‍ॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल २०२२ दरम्यान तांत्रिक उत्पादने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही खालील वस्तू आणि किंमती पाहा.

  • OnePlus 9 Pro 5G वनप्लस ९ प्रो ५ जी विक्रीसाठी अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट रिपब्लिक डे सेल २०२२ मध्ये उपलब्ध आहे. या फोनची किंमत ५५,९९९ रुपये (एमआरपी रु. ६४,९९९) आहे. यावर अतिरिक्त सवलत मिळू शकते. एसबीआय क्रेडिट कार्ड वापरून पाच हजार आणि अतिरिक्त सूट मिळते. तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन खरेदीसोबत स्वॅप करता तेव्हा एक्सचेंज व्हॅल्यूवर पाच हजार सूट मिळेल. अ‍ॅमेझॉन ईएमआय पेमेंटवर कोणताही चार्ज भरावा लागणार नाही.
  • Realme Narzo 50A अ‍ॅमेझॉनकडून या फोनवर हजार रुपयांची सूट दिली जात आहे. ग्रेट रिपब्लिक डे सेल २०२२ दरम्यान Realme Narzo 50A देखील एक्स्चेंज ऑफरसह आहे. किंमत ११८७४ रुपयांपर्यंत किंमत असेल. एसबीआय कार्ड वापरकर्ते १० टक्के (जास्तीत जास्त रु. १२५०) सवलत मिळवण्यात पात्र ठरतील. या फोनची किंमत १३,९९० रुपये असून ११,४९९ रुपयांपर्यंत मिळेल.
  • Xiaomi 11 Lite NE 5G सध्या २६,९९९ (MRP रु.३१,९९९) रुपयांमध्ये विकला जात आहे. अ‍ॅमेझॉनवर कूपन-आधारित १००० रुपये सूट देत आहे. एसबीआय क्रेडीट कार्डवर ४५०० रुपयांची सूट मिळेल. बंडल एक्स्चेंज ऑफरमध्ये ही किंमत २३,५०० रुपयांपर्यंत पोहोचते.
  • Amazon Kindle 10th Gen सध्या ६७९९ रु (MRP ७,९९९ रुपये) आहे. या ईबुक रीडरचा डिस्प्ले ६-इंच आणि इनबिल्ट लाइटसह येतो. तुम्हाला वाचनाची आवड असल्यास आणि अधिक वाचण्यासाठी अधिक संक्षिप्त आणि सोप्या मार्गावर स्विच करायचे असल्यास, किंडल हे तुमच्यासाठी एक चांगलं उत्पादन आहे.

कमी किमतीचा स्मोकी नेकबँड भारतात लॉंच, जाणून घ्या किंमत, फीचर्स, आणि स्पेसिफिकेशन

  • Amazon Fire TV Stick 4K सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. ग्रेट रिपब्लिक डे सेल २०२२ मध्ये ३,४९९ रुपयांना (MRP रु. ५,९९९) उपलब्ध आहे. स्ट्रीमिंग मीडिया प्लेयर भारतातील सर्व प्रमुख ऑनलाइन स्ट्रीमिंग सेवांच्या समर्थनासह, तुमच्या डंब टीव्हीला स्मार्ट टीव्हीमध्ये बदलू शकतो. डॉल्बी व्हिजन, एचडीआर आणि एचडीआर १०+ ला सपोर्ट करते. तुमच्याकडे Amazon Alexa इकोसिस्टममध्ये असल्यास Fire TV Stick 4K जोडणे केवळ अर्थपूर्ण आहे.
  • तुम्ही परवडणारा स्मार्ट टीव्ही शोधत असाल तर Redmi 50-इंच 4K अल्ट्रा एचडी अँड्रॉइड स्मार्ट एलईडी टीव्ही सध्या ३०,००० रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. या प्रोडक्टवर तुम्हाला २,९९८ रुपयांची कुपन सूट मिळेल. तुम्ही जुना टीव्ही मॉडेल देखील बदलू शकता. यावर २,४५० रुपयांची सूट आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amazon great republic day sale 2022 last day rmt

ताज्या बातम्या