एखाद्या व्यक्तीची जीवनशैली दर्शवते की त्याचे शरीर किती निरोगी आहे. जेव्हा आपल्या शरीरात योग्य आहार पोहोचत नाही तेव्हा अनेक प्रकारचे आजार होऊ लागतात. तसेच, जर तुम्ही योग्य जीवनशैलीचे पालन केले नाही, तर तुमचे यकृत, हृदय आणि शरीरातील इतर महत्त्वाच्या अवयवांवर त्याचा परिणाम होतो. त्याचप्रमाणे शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता. कोलेस्टेरॉल ही एकप्रकारची चरबी आहे, जी यकृताद्वारे तयार होतो. कोलेस्ट्रॉलची पातळी राखण्यात आपला आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. योग्य आहार शरीरातील वाईट आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी ठरवतो.

आपले यकृत २ प्रकारचे कोलेस्ट्रॉल बनवते, पहिले LDL आणि दुसरे HDL. डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर स्पष्ट करतात की खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यामुळे, रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक तयार होतो ज्यामुळे रक्त परिसंचरण कमी होते आणि नंतर हृदय किंवा मेंदूचा झटका येऊन मोठी समस्या उद्भवु शकते. शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आपण अनेक औषधे घेणे सुरू करतो. परंतु तुम्ही औषधे न घेता शरीरातील वाईट कोलेस्टेरॉलची पातळी वाढण्यापासून थांबवू शकता. शरीरातील खराब कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास, उच्च रक्तदाब, पायांना सूज येणे इत्यादी अनेक प्रकारची लक्षणे दिसू लागतात.

( हे ही वाचा: तुमच्या वयानुसार तुमची Blood Sugar किती हवी? जाणून घ्या ‘हा’ सोपा तक्ता)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी सोप्या टिप्स

  • तुम्ही नियमित व्यायाम करा. यामुळे शरीरात एचडीएल वाढते आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी होते.
  • धूम्रपान आणि मद्यपान टाळा.
  • वजन टिकवून ठेवण्यासाठी वर्कआउट किंवा योगा खूप महत्त्वाचा आहे.
  • कोलेस्टेरॉल आणि सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट असलेले अन्न खाणे टाळा.
  • काही प्रकरणांमध्ये कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी औषधे आवश्यक असतात. अन्यथा, आपण अन्न आणि चांगल्या जीवनशैलीद्वारे त्यावर नियंत्रण ठेवू शकता.

अशा प्रकारे शरीरातील चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवा

शरीरातील चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढवण्यासाठी काही चांगल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा असे डॉक्टर सुचवतात. यामध्ये बदाम आणि अक्रोड, लिंबूवर्गीय फळे, स्ट्रॉबेरी, द्राक्षे आणि सफरचंद, फायबर-समृद्ध अन्न जसे की बीन्स आणि कडधान्ये, सोया आणि सोया-आधारित अन्न, फॅटी फिश, किडनी बीन्स, बार्ली आणि संपूर्ण धान्य यांचा समावेश आहे.