बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया गेममध्ये लवकरच अपडेट येणार आहे. या अपडेटमुळे गेममधील शस्त्रे आणि वाहने तसेच इन-गेममध्ये सुधारणा होईल. या गेमच्या विकसक कंपनी क्राफ्टनने यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून सविस्तरपणे सांगितले की अपडेटमुळे काय बदल घडणार आहेत. क्राफ्टनचे मूळ गेम PUBG मोबाईल या गेमला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव सप्टेंबर २०२० मध्ये बंदी आणण्यापूर्वी भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळविली. क्राफ्टन बॅटलग्राउंड्स मोबाईल डिव्हिजनचे प्रमुख वूओल लिम म्हणाले, “आम्ही भारतातील आमच्या वापरकर्त्यांनाचे त्यांच्या समर्थनाबद्दल आभार मानू इच्छितो. आमच्या चाहत्यांना आणि खेळाडूंना अधिक आनंद मिळवण्यासाठी आम्ही बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडियामध्ये नवीन आणि अधिक मनोरंजक अपडेट घेऊन येत आहोत.

नवीन शस्त्रे

गेममध्ये एक नवीन लाइट मशीन गन (LGM) येत आहे. एमजी ३ असे या बंदुकीचे नाव आहे. यासोबतच उपचारांच्या वस्तू जोडल्या जातील, ज्याला ग्रेनेड्ससारखे टाकले जाऊ शकते. अपडेटनुसार बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडियामध्ये मर्यादित काळ इग्निशन मोड येत आहे. या नवीन मोडमध्ये ६ नवीन हाय-टेक लोकेशन असतील. नवीन मोडमध्ये पोचिंकी आणि रोझोक अशी छोटी शहरे देखील दिसतील, ज्यांची नावे ३ डी स्वरूपात दर्शविली जातील.

IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात चाललंय तरी काय? मोहम्मद नबीने शेअर केलेली इन्स्टा स्टोरी केली डिलीट, काय आहे कारण?
mohammad nabi run out kagiso rabada ishan kishan wicketkeeping win mumbai indians match vs pbks ipl 2024 aggressive celebration rohit sharma haridik pandya and all mi team
VIDEO : नबी-किशनच्या ‘हुशारी’समोर आशुतोष-शशांकची मेहनत वाया; शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पालटली आणि जे घडलं…
rohit sharma virat kohli
ipl 2024, MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! मुंबई इंडियन्ससमोर आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान
Video Hardik Pandya Trolled Again For Praying At Gujarat Somnath Temple
Video: शेवटचा पर्याय ‘तोच’! हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या सलग तीन पराभवानंतर पोहोचला गुजरातला अन्..

नवीन ट्रांसपोर्ट ऑप्शन

जुलैच्या या अपडेटच्या माध्यमातून गेममध्ये नवीन ट्रांसपोर्ट ऑप्शन देखील पाहिले येणार आहेत. अपडेटनंतर, आपल्याला एक नवीन हायपरलाइन ट्रेन सिस्टम पहायला मिळेल. यामुळे वेगवेगळी ठिकाण बघता येतील. या गाड्यांचा निश्चित मार्ग व वेळ असेल, ज्याद्वारे खेळाडू थोड्या वेळात एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पोहोचू शकतील.

दहा लाखांहून अधिक डाउनलोड

बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडियाला गूगल प्ले स्टोअरवर दहा दशलक्षाहून अधिक डाउनलोड्स मिळाले आहेत. हा खेळ भारतात २ जुलै रोजी सुरू झाला होता. डेव्हलोपार iOS यूजर्स वापरकर्त्यांसाठी हा खेळ कधी आणेल याबद्दल निश्चितपणे काहीही सांगितले जाऊ शकत नाही. या गेममध्ये रोज दररोज १६ दशलक्ष सक्रिय वापरकर्ते आणि २.४ दशलक्ष concurrent वापरकर्त्यांची नोंद आहे. क्राफ्टन असा दावा करतात की बीजीएमआय लाँच पार्टीने आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून गेल्या आठवड्यात आयोजित व्हिडिओवरती पहिल्याच दिवशी जवळपास ५००,००० दर्शकांची संख्या होती.