गोड पदार्थ आवडत नाहीत असे खूप कमी लोक आपल्याला सापडतील. भारतात सण म्हटले की घराघरात आवर्जून गोड पदार्थ तयार केले जातात. या पदार्थांमधील आवश्यक घटक म्हणजे साखर. आपल्या पाक संस्कृतीत साखरेचा मोठ्याप्रमाणावर वापर केला जातो. मात्र साखरेचे अतिसेवन आपल्या आरोग्यासाठी योग्य नाही. म्हणून अनेक आरोग्यतज्ज्ञ साखरेचे सेवन कमी करण्याचा सल्ला देतात. साखरेमुळे आपल्याला काही समस्यांचादेखील सामना करावा लागू शकतो.

साखरेच्या अतिसेवनामुळे आपल्याला,

  • वजन वाढणे
  • हृदयविकार
  • टाइप २ मधुमेह
  • कमकुवत रोगप्रतिकार शक्ती
  • तणाव वाढणे,

अशाप्रकारचे आजार भेडसावू शकतात. त्यामुळे साखरेचे कमी सेवन करणे फायदेशीर ठरते.

काही लोक या आजारांचा धोका कमी करण्यासाठी सामान्य साखरेच्याऐवजी गूळ, मध किंवा ब्राउन शुगरचा आपल्या आहारात समावेश करतात. ब्राउन शुगर आणि सामान्य साखर यामध्ये नेमका काय फरक आहे, याबाबत अनेकजणांच्या मनात शंका असते. या दोघांपैकी कोणत्या प्रकारची साखर आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे अनेकांना माहित नसते. आज आपण ब्राउन शुगर आणि सामान्य साखर यामधील साखरेचा कोणता प्रकार आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Health News : रात्री उशिरा जेवल्यामुळे खरंच वजन वाढतं? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

ब्राउन शुगर म्हणजे काय?

सामान्य साखरेप्रमाणेच ब्राउन शुगरही उसापासूनच तयार केली जाते. ही प्रक्रिया न केलेली साखर असते. यामध्ये मोलॅसिस असल्याने याचा रंग तपकिरी असतो. यामध्ये कॅल्शिअम, लोह, पोटॅशिअम यांची मात्रा सामान्य साखरेपेक्षा अधिक असते. तसेच सामान्य साखरेच्या तुलनेत यामध्ये कॅलरीची मात्रा कमी असते. ब्राउन शुगरचेही तीन प्रकार आहेत, ते म्हणजे, अनरिफाईंड ब्राउन शुगर, डेमेरारा ब्राउन शुगर आणि डार्क ब्राउन शुगर.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ब्राउन शुगर आणि सामान्य साखरेमधील अधिक आरोग्यदायी साखर कोणती?

ब्राउन शुगर आणि सामान्य साखर या दिसायला वेगवेगळ्या असल्या तरीही त्यातील पौष्टिक मूल्यांच्याबाबतीत त्या जवळपास सारख्याच आहेत. पांढऱ्या साखरेच्या तुलनेत ब्राउन शुगरमध्ये अतिरिक्त खनिजे असतात. परंतु ते इतक्या कमी प्रमाणात आहेत की आपल्याला त्यांचा विशेष असा काहीच फायदा होत नाही. त्यामुळे तुम्ही कोणतीही साखर वापरू शकता. मात्र कोणत्याही स्वरूपात साखरेचे सेवन कमीत कमी करणे हेच आपल्या आरोग्याच्यादृष्टीने अधिक फायदेशीर आहे.

Health News : ‘या’ पाच कारणांमुळे येऊ शकतात हातापायांना मुंग्या; असू शकते गंभीर आजारांचे संकेत

बंगळुरू येथील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमधील मुख्य क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट शरण्य शास्त्री यांच्या म्हणण्यानुसार, व्यक्तीने एका दिवसात जास्तीत जास्त २ चमचे म्हणजेज १० ग्राम साखरेचे सेवन करणे पुरेसे आहे.