प्राण्यामधून मिळणाऱ्या प्रथिनांचे सेवन जितके मानले जाते तितके वाईट नाही, कारण कॅनेडियन संशोधकांनी केलेल्या अलीकडील अभ्यासातून असे दिसून आले आहे की,”प्राण्यामधून मिळणाऱ्या प्रथिने कर्करोगामुळे मृत्यूचा धोका वाढवत नाही, परंतु ते काही प्रमाणात संरक्षण देखील प्रदान करू शकते. खरं तर, बऱ्याच काळापासून असा समज आहे की,”मांस, अंडी किंवा मासे यासारख्या प्राण्यांच्या प्रथिनांचे सेवन कर्करोग आणि इतर रोगांचा धोका वाढवते, परंतु कॅनेडियन संशोधकांच्या एका नवीन अभ्यासाने या विचारसरणीला आव्हान दिले आहे.” अभ्यासात असे आढळून आले आहे की,”प्राण्यामधून मिळणाऱ्या प्रथिने कर्करोगाने मृत्यूचा धोका वाढवत नाही, परंतु ते सौम्य संरक्षण देखील प्रदान करू शकते. त्याच वेळी, वनस्पती-आधारित प्रथिनांच्या बाबतीत फारसे फायदेशीर परिणाम आढळले नाहीत.”
संशोधनात काय आढळले?
हा अभ्यास १९ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या १५,९३७ प्रौढांवर केला गेला. संशोधनात आढळले की, प्राणीजन्य किंवा वनस्पतीजन्य प्रथिनांचे सामान्य सेवन मृत्यूचा धोका वाढवत नाही. कर्करोगामुळे मृत्यूच्या धोक्याच्याबाबत, प्राणीजन्य प्रथिनांमुळे सौम्य संरक्षणात्मक परिणाम दर्शवला, तर वनस्पतीजन्य प्रथिनांचा काही खास प्रभाव दिसला नाही. संशोधकांनी सांगितले की,”ही निष्कर्षे आधी झालेल्या एका अभ्यासापेक्षा अगदी वेगळी आहेत, ज्यामध्ये ५० ते ६० वर्ष वयोगटातील लोकांमध्ये प्राणीजन्य प्रथिनांमुळे कर्करोगाचा धोका चारपट वाढतो असे सांगितले गेले होते.
मागील आणि सध्याच्या संशोधनातील फरक
कॅनाडातील संशोधकांनी सांगितले की,”मागील अभ्यासात एक दिवसाच्या प्रथिन सेवनावर आधारित धोका मोजला गेला होता, तर सध्याच्या अभ्यासात दीर्घकालीन आहाराच्या सवयींचा अभ्यास केला गेला.” मॅकमास्टर युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक स्टुअर्ट फिलिप्स म्हणतात की, “या संशोधनात गोल्ड स्टँडर्ड पद्धतींचा वापर करून पाहिले गेले आहे की, दीर्घकाळाच्या आहाराच्या सवयी मृत्यूच्या धोका कसा प्रभावित करतात.”
प्राणीजन्य प्रथिने पूर्णपणे सुरक्षित आहे का?
मॅक्स हेल्थकेअरच्या क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट ऋतिका सामद्दार यांच्या मते, “जपानमध्ये मांस कमी तापमानावर स्ट्यूसारखे शिजवले जाते, जे तुलनेने सुरक्षित आहे, पण अमेरिकेत ज्या पद्धतीने ते फ्राय किंवा बार्बेक्यू केले जाते, ती पद्धत धोकादायक ठरू शकते. डॉक्टरांचा मत आहे की, प्राण्यांमधून मिळणाऱ्या प्रथिनांपेक्षा महत्त्वाचे आहे ते कसे शिजवले जाते. सामन्य रस्सा किंवा स्ट्यूमध्ये शिजवलेले मांस फ्राय किंवा बार्बेक्यू केलेल्या मांसापेक्षा हानिकारक नसते. खूप उष्णतेवर शिजविल्याने नायट्रोसामाइनसारखे हानिकारक घटक तयार होतात, जे कर्करोगाशी संबंधित आहेत. त्याचप्रमाणे, काही संरक्षक देखील कर्करोगजन्य संयुगे तयार करू शकतात.
वनस्पतीजन्य प्रथिनांचे महत्त्व
सोयाबीन, डाळी, बीन्ससारख्या स्रोतांमधून पुरेसा प्रथिने मिळवता येतात, पण या अभ्यासात आढळले की, प्राण्यांमधून मिळणारे प्रथिनांपासून वनस्पतीतून मिळणाऱ्या प्रथिनांकडे वळण्याचा स्पष्ट फायदा दिसला नाही. तरीही लाल मांस(रेड मीट)चे जास्त सेवन टाळण्याची गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्थेनुसार लाल मांस (रेड मीट ) काही कर्करोगांशी संबधीत असल्याचे सांगितले जाते आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, लाल मांस (रेड मीट) चे जास्त सेवन हृदयाच्या आजारांचा धोका वाढवू शकते, तर फिश आणि पोल्ट्री तुलनेने सुरक्षित पर्याय आहेत.