Celebrity Lifestyle : नेट वर्थपासून महागड्या छंदांपर्यंत, जाणून घ्या कसं आहे कतरिना कैफचं आयुष्य?

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक कतरिना कैफ लवकरच अभिनेता विकी कौशलसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. जाणून घेऊया कतरिना कैफच्या लाइफस्टाइलबद्दल सविस्तर.

Katrina-Kaif-lifestyle
(Photo: Instagram/ Katrina Kaif)

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक कतरिना कैफ लवकरच अभिनेता विकी कौशलसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. फिल्मी दुनियेत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये आपला अभिनय सिद्ध करणाऱ्या कतरिनाची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. कतरिना कैफ ही बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. कतरिना कैफ नुकतीच ‘सूर्यवंशी’मध्ये दिसली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिना नेहमीच लक्झरी लाइफ पसंत करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

आत्तापर्यंत ४० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या कतरिनाला तिच्या अभिनयासोबतच लूकसाठीही चांगलीच पसंती मिळाली आहे. आता ती विकी कौशलसोबत आयुष्याचा नवा प्रवास सुरू करणार आहे. जाणून घेऊया कतरिना कैफच्या लाइफस्टाइलबद्दल सविस्तर.

नेट वर्थ किती आहे ?
कतरिना कैफ ही बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिनाची एकूण संपत्ती २२४ कोटींहून अधिक आहे, याशिवाय ती चित्रपट आणि जाहिरातींमधून दरवर्षी २४ कोटींहून अधिक कमावते. ती एका चित्रपटासाठी ५ ते ८ कोटी रुपये घेते.

कतरिनाचे घर
कतरिना कैफ ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार ती अजूनही भाड्याने राहते. विशेष म्हणजे ती राहत असलेल्या घराचे भाडेही लाखात आहे.

आणखी वाचा : Corona : तुमच्या मुलांना सुद्धा सुई लावून घेताना भीती वाटते का? त्यांना कसं करायचं तयार? जाणून घ्या

लक्झरी कार संग्रह
कतरिना कैफला लक्झरी वाहनांची खूप आवड आहे. रेंज रोव्हर, मर्सिडीज बेंझ, ऑडी क्यू ही वाहने तिच्या यादीत आहेत. कतरिना कैफ अनेकदा रेंज रोव्हरमध्ये दिसते.

आणखी वाचा : Vastu Tips : लग्न उशीरा होण्याचं कारण असू शकतं वास्तुदोष, या उपायांनी दोष दूर करा

विकी कौशलशी लग्न
बातम्यांनुसार, कतरिना लवकरच विकी कौशलसोबत लग्न करणार आहे. दोघे जयपूरमध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. विकी कौशल आणि कतरिनाच्या लग्नाच्या बातम्यांनी सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Celebrity lifestyle katrina kaif net worth and lifestyle vicky katrina wedding prp

ताज्या बातम्या