नवी दिल्ली : गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग रोखण्यासाठी देशात एचपीव्ही (ह्युमन पेपिलोमावायरस) लस विकसित करण्यात आली आहे. ही लस पुढील वर्षी एप्रिल-मे दरम्यान उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ‘एनटीएआय’चे अध्यक्ष डॉ. एन. के. आरोरा यांनी या संदर्भात माहिती दिली. ९ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींना ही लस देण्यासाठी २०२३ च्या मध्यापर्यंत राष्ट्रीय पातळीवर मोहीम हाती घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

वयाच्या ३५ वर्षांनंतर गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग तपासणी करणे आवश्यक आहे. सुरुवातीच्या टप्प्यात या आजाराचे निदान झाले तर ‘एचपीव्ही’द्वारे उपचार करणे शक्य असते, असे तज्ज्ञ सांगतात.

सध्या गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोगाच्या लसीच्या एका मात्रेची किंमत अडिच ते तीन हजार रुपये आहे. मात्र नवीन लस खूप स्वस्त असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतात या कर्करोगाने मृत्यू होण्याचे प्रमाण खूप मोठे असून  देशातील १५ ते ४४ वयोगटातील महिलांना होणारा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे. पाठदुखी, बेंबीच्या खाली सतत दुखणे, लघवी करताना दुखणे आदी या आजाराची लक्षणे आहेत.