करिअरमध्ये खूप मोठे स्थान मिळवणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. यासाठी लोकं मेहनत करतात, स्वत:ला अपडेट ठेवतात. मात्र एवढे करूनही अनेकवेळा पात्रता असूनही लोकांना ते पद मिळू शकलेले नाही. चाणक्य नीतीमध्ये यामागे काही कारणे सांगितली आहेत. आचार्य चाणक्य म्हणतात की एखादी व्यक्ती अशा काही चुका करते ज्यामुळे त्याच्या यशाच्या मार्गात अडथळे येतात. या चुका त्याला यशस्वी होऊ देत नाहीत.

विसरूनही या चुका करू नका

आचार्य चाणक्य म्हणतात की, माणसाच्या यशाचा पाया त्याच्या तारुण्यातच रोवला जातो. अशा वेळी जर त्याने चांगले आचरण, मेहनत आणि प्रामाणिकपणाने काम केले तर आयुष्यभर यश मिळत राहते. तसेच खूप नाव कामावतात आणि अफाट संपत्तीचे मालक बनतात. परंतु तारुण्यात झालेल्या चुका काही लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करतात.

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Insomnia Before Period
महिलांनो, मासिक पाळीदरम्यान चांगली झोप येत नाही? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या ‘या’ ४ गोष्टी करुन पाहा, लागेल शांत झोप
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय

– अंमली पदार्थांचे व्यसन माणसाला बरबाद करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे त्याचे वैयक्तिक आणि कामाचे आयुष्य उद्ध्वस्त होते. जसेच काही लोकं तरुण वयातच ड्रग्ज घेण्यास सुरुवात करतात, ते आयुष्यात खूप मागे राहतात. ते पुरेसे पैसे कमवू शकत नाहीत आणि नाव कमवू शकत नाहीत.

– आळस ही खूप वाईट गोष्ट आहे, ती कर्तृत्ववान व्यक्तीची प्रतिभा देखील नष्ट करते. तारुण्यातला आळस आयुष्य उध्वस्त करतो. हे असे वय असते जेव्हा माणूस पूर्ण उर्जेने काम करतो आणि आपले भविष्य चांगले करण्यासाठी रात्रंदिवस एक करतो. तर आळशीपणाने तो त्याच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा काळ गमावतो आणि नंतर त्याला आयुष्यभर पश्चाताप होतो.

– वाईट संगती माणसाला त्याच्या ध्येयापासून विचलित करतात. आपले काम, ध्येये सोडून काही लोकं अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू लागतात. तारुण्याचा मौल्यवान वेळ वाईट संगतीत वाया जातो. तसेच, बर्‍याच बाबतीत, व्यक्ती संपूर्ण आयुष्यासाठी वाईट आणि विस्मरणाच्या अंधारात जाते.