These 3 Powerful Fruits Naturally Cleanse Your Liver and Kidneys: आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या शरीरावर सगळ्यात जास्त ताण पडतो तो किडनी आणि लिव्हर या दोन अवयवांवर. अनियमित आहार, जंकफूड, धूम्रपान, मद्यपान आणि प्रदूषण या सगळ्यांचा थेट परिणाम शरीराच्या या ‘फिल्टरिंग सिस्टीम’वर होतो. काळानुसार या दोन अवयवांमध्ये विषारी टॉक्सिन्स जमा होऊ लागतात आणि त्याचे परिणाम म्हणून थकवा, चेहऱ्यावर डाग, अपचन, पोटदुखी आणि वारंवार होणारे आजार दिसू लागतात.
पण, चांगली बातमी म्हणजे या घाणेला औषधांनी नव्हे, तर निसर्गाच्या तीन अद्भुत फळांनी सहज दूर करता येतं.
एम्सचे माजी सल्लागार आणि साओल हार्ट सेंटरचे संस्थापक डॉ. बिमल झांजेर यांनी सांगितलं आहे की, फक्त योग्य आहाराच्या सवयींनी आणि ही तीन फळं रोज आहारात घेतल्यास लिव्हर आणि किडनी दोन्हींची नॅचरल क्लिनिंग होते.
किडनी आणि लिव्हरमधील घाण बाहेर काढतील ही ३ जादुई फळं
१. जांभूळ
जांभूळ म्हणजे केवळ उन्हाळ्यातील स्वादिष्ट फळ नाही, तर ते शरीरासाठी ‘डिटॉक्स कॅप्सूल’सारखं आहे.
यात असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि फाइटोकेमिकल्स शरीरातील युरिक अॅसिड नियंत्रणात ठेवतात, ज्यामुळे किडनीवरील ताण कमी होतो आणि खड्यांसारख्या समस्यांपासून बचाव मिळतो. जांभळाच्या रसातील जंतूनाशक घटक मूत्रमार्गातील संक्रमण कमी करून शरीराला थंडावा देतात. नियमित सेवनाने रक्त शुद्ध होते आणि किडनीमध्ये साचलेले टॉक्सिन्स नैसर्गिकरित्या बाहेर पडतात.
२. डाळिंब
डाळिंबाचं नाव आलं की लगेच आठवतो तपकिरी-लाल रस, जो शरीराला आतून ताजेपणा देतो. डाळिंबात आढळणारे पॉलीफेनॉल्स आणि व्हिटॅमिन C लिव्हरच्या पेशींना पुन्हा सक्रिय करतात आणि जुन्या साचलेल्या घाणीतून मुक्तता देतात. हे फळ केवळ लिव्हरमधील टॉक्सिन्स बाहेर काढत नाही, तर रक्तशुद्धी, हिमोग्लोबिन वाढवणं आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणं हे तीनही कामं एकाच वेळी करतं. दररोज एक ग्लास डाळिंबाचा रस घेतल्यास लिव्हरचं नैसर्गिक पुनरुज्जीवन सुरू होतं.
३. पपई
पपई म्हणजे प्रत्येक घरात सहज मिळणारं पण अत्यंत परिणामकारक फळ. यात असलेलं पपेन नावाचं एन्झाइम पचनक्रिया सुधारतं, त्यामुळे लिव्हरवरील दबाव कमी होतो. पपईतील फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स शरीरातील साचलेले टॉक्सिन्स शौचावाटे बाहेर काढतात, ज्यामुळे फॅटी लिव्हर, अपचन आणि वायूचे त्रास कमी होतात. सकाळी उपाशीपोटी काही तुकडे पपईचे खाल्ल्यास काही दिवसांतच पोट हलकं, त्वचा उजळ आणि शरीर ऊर्जावान वाटू लागतं.
डॉ. बिमल झांजेर यांच्या मते जांभूळ, डाळिंब आणि पपई या तीन फळांचा नियमित समावेश केल्यास लिव्हर आणि किडनी दोन्हींची कार्यक्षमता वाढते. ही फळं शरीरातील साचलेली वर्षानुवर्षांची घाण नैसर्गिकरित्या बाहेर काढतात आणि रक्तशुद्धीपासून ते रोगप्रतिकारशक्तीपर्यंत प्रत्येक स्तरावर फायदा करतात. औषधांच्या ऐवजी निसर्गाचा हा मार्ग अवलंबा आणि फक्त तीन महिन्यांत अनुभव घ्या.