Moong Dal Sandwich Recipe Video: सकाळची सुरुवात जशी होते त्यावर बऱ्यापैकी तुमचा दिवस कसा जाणार हे ठरतं असं म्हणतात, तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का? जर हे खरं असेल तर आपल्या प्रत्येक सकाळची सुरुवात आनंदी करणं हे तर आपल्याच हातात आहे. असं म्हणतात चांगलं जेवण हे कधीही कुणाचाही मूड झटक्यात बदलू शकतं. मग सकाळची सुरुवात चांगली करायची असेल तर चांगला नाश्ता करायला हवा हे तर आलंच. सकाळी कामाची गडबड असताना रोज रोज नवीन काय बनवणार असा प्रश्न असतो आज आपण याच प्रश्नाचं एक चविष्ट उत्तर पाहणार आहोत. आपण बनवायचंय सँडविच! तुम्ही म्हणाल यात काय नवीन तर मंडळी हे सँडविच एकतर आपण विना ब्रेड बनवणार आहोत, यात भरपूर प्रोटीन असणार आहे आणि चव.. तुम्ही जेव्हा @myflavourfuljourney या चॅनेलवर शेअर केलेली ही रेसिपी वाचाल तेव्हा तुम्हाला चवीचा आपसूक अंदाज येईलच, त्यामुळे अजिबात वेळ न घालवता पाहूया मुगाच्या डाळीचं प्रोटीनयुक्त सँडविच!

साहित्य

मूग डाळ
कांदा, शिमला मिरची, हिरवी चिरलेली मिरची
लाल सुक्या मिरचीचे फ्लेक्स (चिली फ्लेक्स)
चीज, बटर

मूग डाळ सँडविच रेसिपी

  • मूग डाळ रात्रभर भिजत ठेवा
  • मिक्सरच्या भांड्यात रात्रभर भिजवलेली मूग डाळ घालून त्याची बारीक पेस्ट तयार करा
  • पीठ अगदी घट्टही नसावं किंवा अगदी पातळही नसावं, साधारण ढोकळ्यासारखं पीठ असावं. वाटून झाल्यावर किमान १० मिनिटं तरी पीठ असेच राहूद्या.
  • कांदा, शिमला मिरची आणि हिरवी मिरची बारीक चिरून त्यात चिली फ्लेक्स, ओरेगॅनो आणि चवीनुसार मीठ टाका आणि बाजूला ठेवा.
  • आता पीठ घ्या आणि 1-2 मिनिटे चांगले फेटून घ्या (आपण 1/2 टीस्पून बेकिंग सोडा देखील घालू शकता)
  • आता एक सँडविच टोस्टर घ्या आणि त्यात थोडं बटर घाला आणि नंतर पीठ घालून त्यावर चीज स्लाईस (ऐच्छिक) घाला.
  • या स्लाइसवर चिरलेल्या भाज्या घालून वरून पुन्हा थोडे पीठ घालून घ्या.
  • टोस्टर बंद करून दोन्ही बाजूंनी मंद आचेवर भाजून घ्या.

छान क्रिस्पी- कुरकुरीत सँडविच तुम्ही मध्ये कापून चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.

हे ही वाचा<< Video: सकाळी उठताच १५ मिनिटांत पोट स्वच्छ होण्यासाठी करा ‘या’ पाच कृती; कोमट पाणी पिण्याचं प्रमाणही पाहा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात भाज्या घालू शकता, तसेच तुम्हाला व्हीगन पर्याय हवा असल्यास चीज सुद्धा घालणे टाळू शकता. तुम्हाला ही हाय प्रोटीन सँडविच रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा