आपल्या हृदयाचे आरोग्य एका दिवसात चांगले होत नाही. रोजच्या छोट्या-छोट्या सवयी हृदयाला मजबूत किंवा कमकुवत करू शकतात. आजच्या काळात रोजच्या धावपळीत चुकीचा आहार, अनहेल्दी लाईफस्टाइल आणि व्यायाम न करणे अभाव यामुळे हृदयाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. पण हृदयरोग अचानक विकसित होत नाहीत; ते आपण खातो त्या अन्नाचा, आपण घेत असलेल्या झोपेचा, आपण करत असलेल्या हालचालींचा आणि आपण सहन करत असलेल्या ताणाचा परिणाम आहे. या सर्व घटकांचा हृदयाच्या आरोग्यावर हळूहळू परिणाम होतो.
भूलतज्ज्ञ आणि वेदनाशामक औषध चिकित्सक, डॉ. कुणाल सूद स्पष्ट करतात की,” प्रक्रिया केलेले अन्न, साखरेचे पेये, ताणतणाव आणि झोपेचा अभाव यासारख्या काही सामान्य सवयी हळूहळू आपले हृदय कमकुवत करतात. जर लवकर लक्ष दिले तर अनेक गंभीर आजार टाळता येतात.”
१. अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्सचा जास्त वापर (Excessive Consumption of Ultra-Processed Foods)
अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्समध्ये रिफाइंड स्टार्च, साखर, ट्रांन्स फॅट आणि सोडियम खूप असतो. हे फूड्स जास्त वेळ ताजे राहण्यासाठी बनवले जातात, पण शरीरासाठी हानीकारक असतात. जास्त सोडियम ब्लड प्रेशर वाढवतो आणि रक्तवाहिन्यांवर परिणाम करतो.
२. जास्त साखरअसलेले ड्रिंक्स (High-Sugar Drinks)
सोडायुक्त ड्रिंक्समध्ये खूप जास्त साखर असते. हे रक्तातील साखर आणि इंसुलिन लगेच वाढवते. वारंवार केल्यास शरीर इंसुलिनसाठी संवेदनशील राहू शकत नाही, लिव्हरमध्ये चरबी(फॅट्स) जमा होते आणि ट्रायग्लिसराईड्स वाढतात.
३. बराच वेळ बसून राहणे (Prolonged Sitting)
सलग तीन-चार तास बसल्याने पायाच्या स्नायूंना रक्त पुरवठा कमी होतो. १० तासांपेक्षा जास्त बसल्यास ब्लड क्लॉट्सचा धोका ३ पट वाढतो.
४. नीट झोप न होणे (Poor or Inadequate Sleep)
नींद ही फक्त आराम नाही, तर शरीर दुरुस्त करण्याची प्रक्रिया आहे. झोप कमी किंवा खंडित होत असल्यास हृदयाच्या ठोक्यांचा दर आणि रक्तदाब वाढतो. दीर्घकाळ नीट झोप न झाल्यास हृदयाच्या नलिकांची लवचिकता कमी होते.
५. धूम्रपान आणि वेपिंग (इ-सिगारेट्स) (Smoking and Vaping (E-Cigarettes))
धूम्रपान आणि वेपिंग(इ-सिगारेट्स) दोन्ही हृदय आणि रक्तवाहिन्यांना नुकसान करतात. एक वेपिंग सेशन देखील धमन्यांचा कडकपणा वाढवते आणि रक्तदाब वाढवते. दीर्घकाळ असे केल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो.
६. इतर सावधगिरी(Other Precautions)
सकाळी उठल्यावर काही लक्षणे दिसल्यास हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकची शक्यता असते. अशा साइन इग्नोर करू नका.