Dhanteras 2021 Date, Puja Timings: गेली दोन वर्षे करोनाच्या सावटाखाली दिवाळी साजरी करावी लागली होती. यंदाच्या दिवाळीला करोनाचा कहर कमी झाला असला तरी धोका अद्याप टळलेला नाही. म्हणूनच यंदाची दिवाळी सुद्धा अगदी साधेपणानं साजरी करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. पाच दिवसाच्या दिवाळीच्या सणाची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. दिवाळीमध्ये धनत्रयोदशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे असलेल्या संपत्ती, धनाची या दिवशी पूजा केली जाते. बरेच जण या दिवशी सोन्याची खरेदी करतात. आपल्याकडे असलेल्या धनलक्ष्मीबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे धनतेरस किंवा धनत्रयोदशी. व्यापारी, सराफ आणि शेतकऱ्यांमध्ये या सणाला विशेष महत्त्व दिलं जातं. या वर्षी २ नोव्हेंबर रोजी मंगळवारी धनत्रयोदशी साजरी होत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊयात धनत्रयोदशीच्या पूजेची पद्धत, खरेदी, शुभ मुहूर्त आणि सर्व आवश्यक माहिती….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धनत्रयोदशी पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त | Dhanteras 2021 Puja Shubh Muhurat

कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी तिथीचा प्रारंभ २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३१ वाजता सुरू होईल आणि ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ०९.०२ वाजता संपेल. प्रदोष काल संध्याकाळी ०५.३५ ते ०८.११ पर्यंत राहील. धनत्रयोदशीच्या पूजेचा मुहूर्त संध्याकाळी ०६.१७ ते रात्री ०८.११ पर्यंत असेल. यम दीपमची वेळ संध्याकाळी ०५.३५ ते ०६.५३ पर्यंत असेल.

( हे ही वाचा: Dhanteras 2021 Shopping Timing: धनत्रयोदशीच्या दिवशी या शुभ मुहूर्तावर राशीनुसार करा खरेदी, धन-धान्यात होईल वृद्धी )

धनत्रयोदशी पूजा विधी | Dhanteras 2021 Puja Vidhi

धनत्रयोदशीच्या पूजेच्या वेळी उत्तर दिशेला विष्णू, लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग कुबेर आणि धन्वंतरीची स्थापना करून तुपाचा दिवा लावला जातो. दिव्याचं पूजन करून तो दिवा घराच्या दाराजवळ आणि धान्याच्या राशीजवळ ठेवला जातो. हा दिवा रात्रभर जळत राहू दिला जातो. त्यामुळे घरात लक्ष्मीचं आगमन होऊन ती स्थिर होते, असा समज आहे.
भगवान सूर्य, भगवान गणेश, माता दुर्गा, भगवान शिव, भगवान विष्णू, माता लक्ष्मी, कुबेर देव आणि भगवान धन्वंतरी यांच्या मूर्ती स्थापित करा. यानंतर भगवान धन्वंतरीची षोडशोपचार पूजा करावी. भगवान धन्वंतरीला गंध, अबीर, गुलाल, फुले, रोळी, अक्षत इत्यादी अर्पण करा. त्याच्या मंत्रांचा जप करा. त्यांना खीर अर्पण करा. भगवान धन्वंतरीला श्रीफळ आणि दक्षिणा अर्पण करा. पूजेच्या शेवटी कापूर लावून आरती करावी. त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा. यमदेवतेच्या नावाने दिवा लावा. या दिवशी धन्वंतरी जन्मोत्सव व्रत करावं. संध्याकाळी ईशान्य दिशेकडे तोंड करून धन्वंतराची प्रार्थना केल्यामुळे दीर्घायुष्य मिळतं, असं मानलं जातं.

याच दिवशी यमदीपदान हे व्रत सुद्धा केलं जातं. यामध्ये धनत्रयोदशीच्या निमित्ताने दीपदान करण्यात येतं. या दिवशी संध्याकाळी घराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर एका पात्रात अन्न ठेवलं जातं. राईच्या तेलाने भरलेला मातीचा दिवा त्यावर ठेऊन दक्षिण दिशेकडे वात करून तो लावला जातो. त्या दिव्याचे विधीवत पूजन करून यमराजांची प्रार्थना केली जाते.

धन्वंतरी आणि गणपती-लक्ष्मीची पूजा करण्यासाठी सर्वात आधी लाकडी पाट घ्या. त्यावर स्वस्तिक काढा. धन्वंतरी आणि गणपती-लक्ष्मीची पूजा करण्यासाठी सर्वात आधी लाकडी पाट घ्या. त्यावर स्वस्तिक काढा. त्यावर तेलाची ज्योत असलेला दिवा लावा. दिव्याला हळद-कुंकु आणि तांदुळ लावा. त्यानंतर तुमच्याकडे असलेलं धान्य, धन, सोनं या वस्तूंची पूजा करा. गणपती आणि लक्ष्मीची पूजा करा. नमस्कार करावा. हे लक्षात असू द्या की पूजा करण्याआधी पाटाची दिशा ही मुख्य दाराच्या दक्षिणेला असावी.

कुबेराला पांढऱ्या रंगाची आणि धन्वंतरीसमोर पिवळ्या रंगाची मिठाईचा नैवैद्य ठेवला जातो. ‘ॐ ह्रीं कुबेराय नमः’ आणि ‘धनवंतरी स्तोत्र’ जप केला जातो. घरातील सोन्या, चांदीचे दागिने आणि नाण्यांची पूजा केली जाते. घराच्या बाहेर राईच्या तेलाचा दिवा देखील लावला जातो. या दिवशी वस्त्र आणि अलंकाराची खरेदी करणं शुभ मानलं जातं. या दिवशी उपवासही केला जातो. घरातले अलंकार तिजोरीतून काढून स्वच्छ करून ते पुन्हा जागेवर ठेवले जातात.

धनत्रयोदशीच्या दिवसाची परंपरा:

धनत्रयोदशीच्या दिवशी पितळ, चांदी, स्टीलची भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की, या दिवशी भांडी खरेदी केल्याने संपत्ती आणि समृद्धी मिळते. या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि अंगणात दिवे लावले जातात. कारण या दिवसापासून दिवाळीचा सण सुरू होतो.
धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी यमाच्या नावाने दिवा लावला जातो. असे मानले जाते की असे केल्याने यमदेव प्रसन्न होतात आणि कुटुंबातील सदस्यांचे अकाली मृत्यूपासून रक्षण करतात.

धनत्रयोदशीला काय खरेदी करावे?

या दिवशी सोने, चांदी, पितळ अशा नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. यासोबतच धणे आणि झाडू खरेदी करणे देखील या दिवशी शुभ आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhanteras 2021 muhurt and auspicious puja time worship on this auspicious time on dhanteras it is believed that there will be no shortage of money and grains prp
First published on: 01-11-2021 at 22:04 IST