सणाच्या दिवसी प्रत्येकजण आपल्या घराच्यांबरोबर एकत्र राहणे पसंत करतात. विशेषत: दिवाळीच्या सणाच्यावेळी. कुटुंबासह एकत्र सण साजरे करण्याची मज्जा काही वेगळीच आहे. पण कित्येकदा अनेक कारणामुळे नोकरी किंवा शिक्षणामुळे लोक सणासुदीच्या काळातही घरी जाऊ शकत नाही. सण हे एकता आणि उत्सवाचे प्रतिक आहेत अशावेळी कुटुंबापासून वेगळे राहणारे लोक एकटेपणाचा सामना करावा लागतो. तुम्हीही जर यंदाच्या दिवाळीला घरापासून, कुटंबापासून दूर आहात तर चिंता करू नका. आम्ही काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्हाला एकटेपणा जाणवणार नाही आणि दिवाळीच्या सणांचा आनंद घेऊ शकाल.

कुटुंब आणि मित्रांसह करा
सणांच्या काळात एकटेपणाचा सामना करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे कुटुंब आणि मित्रांशी संपर्क साधणे. प्रियजनांशी बोलण्याचा प्रयत्न करा, ते कितीही दूर असले तरीही. व्हिडीओ कॉलिंग, फोनवर बोलणे किंवा मेसेज पाठवणे यामुळे अंतर कमी होते आणि आपलेपणाची भावना येते.

सण समारंभात सामील व्हा
जर तुम्हाला सणांमध्ये एकटेपणा वाटत असेल तर तुम्ही स्थानिक उत्सव किंवा कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ शकता. या कार्यक्रमांमध्ये भाग घेतल्याने तुम्हाला इतर लोकांशी संपर्क साधण्यात मदत होईल. असे केल्याने तुमचा एकटेपणा देखील दूर होईल आणि तुम्हाला नवीन लोकांना भेटता येईल.

हेही वाचा – Children’s Day 2023: दरवर्षी १४ नोव्हेंबरला का साजरा केला जातो बालदिन? जाणून घ्या महत्त्व आणि इतिहास

दान करा किंवा आर्थिक मदत करा –
जेव्हा तुम्ही इतर लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत नाही तेव्हा तुम्हाला एकाकीपणाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत, लोकांशी जोडले जाण्यासाठी तुम्ही परोपकार करणे महत्वाचे आहे. अशा अनेक संस्था आहेत ज्यांना सणासुदीच्या काळात अतिरिक्त मदतीची गरज असते. या काळात तुम्ही तुमचा वेळ इथे देऊ शकता आणि लोकांना मदत करू शकता. यामुळे तुम्हाला खूप बरे वाटेल.

स्वतःची एक नवीन परंपरा तयार करा –
एकटेपणा कधी कधी तुम्हाला अशा संधी देतो ज्याद्वारे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे स्वतःसाठी नवीन परंपरा निर्माण करू शकता. या काळात तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ तयार करू शकता, घर सजवू शकता आणि तुम्हाला आनंद देणार्‍या सर्व कामांमध्ये सहभागी होऊ शकता. यामुळे तुम्‍हाला आनंद होतो आणि सणाच्‍या काळात तुम्‍हाला सकारात्मक वाटते.

हेही वाचा- सणासुदीच्या काळात सोने-चांदी खरेदी करताय? मग ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वत:ची काळजी घ्या –
एकटेपणावर मात करण्यासाठी स्वत:ची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. जरी यामुळे एकटेपणाची भावना पूर्णपणे नाहीशी होऊ शकत नाही, परंतु स्वत: ची विशेष काळजी घेतल्यास तुम्हाला बरे वाटू शकते. या काळात तुम्ही त्या सर्व गोष्टी करू शकता ज्या तुम्हाला करायला खूप आवडतात. त्यामुळे तुम्हाला एकटेपणा जाणवणार नाही कारण तुमचे मन तुमच्या आवडीच्या गोष्टींमध्ये रमलेले असेल.