लहानपणापासूनच आपण ट्रेनमधून प्रवास करत आलो आहोत. रेल्वे स्टेशनवरून (Railway Station) आपण ट्रेन (Train) पकडतो. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण या नावांचा उच्चार इंग्रजीमधूनच का करतो? तुम्हाला माहित आहे का रेल्वे आणि रेल्वे स्टेशनला भारतीय भाषेत काय म्हणतात? आज आपण ट्रेन आणि रेल्वे स्टेशनला भारतीय भाषेत काय नाव आहे हे जाणून घेऊया.

आपण नेहमीच या गोष्टींसाठी इंग्रजी नावांचा वापर करत आलो आहोत. परंतु आपण कधीच त्यांची भारतीय नावे जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही. काही लोकांना तर ट्रेन आणि रेल्वे स्टेशन ही नावे भारतीयच वाटतात. पण हे चुकीचं आहे. ट्रेनला भारतीय भाषेत ‘लोहपथ गामिनी’ म्हणतात. सोप्या शब्दात लोक ट्रेनला रेलगाडी किंवा आगगाडी असेही म्हणतात.

What Navneet Rana Said?
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, “मला माझी मुलं रोज विचारायची, आई…”
maharshtra voters on election
पंतप्रधान मोदींना पर्याय कोण? महाराष्ट्रातील जनतेच्या काय आहेत भावना?
salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
Girls fight Video
तुफान राडा! भर रस्त्यात मुलींची दे दणादण हाणामारी; लाथा-बुक्क्यांनी मारलं, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, अन्… Video व्हायरल

Video : दुर्मिळ आजाराशी लढा देत, वयाच्या १४व्या वर्षी समुद्रावर राज्य करणारी भारताची जलपरी; गोष्ट अ’सामान्यांची – भाग १६

खरंतर, लोहपथ गामिनी या शब्दाचे सविस्तर वर्णन केले तर समजेल की हे नाव इतके अवघड का आहे. लोहपथ याचा अर्थ लोखंडाचा रास्ता आणि गामिनी म्हणजे अनुसरण करणारी किंवा चालणारी. या सर्व शब्दांना जोडून ट्रेनला भारतीय भाषेत ‘लोहपथ गामिनी’ असे म्हटले जाते.

तसेच, रेल्वे स्टेशनला भारतीय भाषेत ‘लोहपथ गामिनी विराम बिंदू’ किंवा ‘लोहपथ जमिनी विश्राम स्थळ’ असे म्हटले जाते. हे नाव इतके लांब आणि गुंतागुंतीचे आहे की लोक इंग्रजीत रेल्वे स्टेशन म्हणणे पसंत करतात. ही नावे ऐकल्यानंतर तुम्ही देखील थक्क व्हाल. लोकांना सोप्या भाषेत बोलणे आवडते, त्यामुळे लोक ही कठीण नावे उच्चारण्यापेक्षा ट्रेन, रेल्वे स्टेशन म्हणणे पसंत करतात. तरुण पिढीलाही इंग्रजी भाषेचा अधिक वापर करायला आवडते. तथापि, याबद्दल जाणून घेणे फार महत्वाचे आहे.