Blood Sugar, Dengue: डेंग्यूच्या आजाराचे अनेक नवीन रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे या आजारापासून संक्रमित न होण्यासाठी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर अशा वेळी तुम्ही अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे. मधुमेहींसाठी डेंग्यू किती धोकादायक आहे आणि त्यांनी कोणती खबरदारी घ्यावी हे जाणून घेऊया.

पुण्यातील कार्डिओमेट क्लिनिकच्या जनरल फिजिशियन वैशाली पाठक यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, डेंग्यू टाळण्यासाठी मधुमेहींनी अधिक खबरदारी घेतली पाहिजे. कारण मधुमेही रुग्णांना डेंग्यूचा धोका जास्त असतो.

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?

( हे ही वाचा: फुफ्फुसात पाणी का भरते? जाणून घ्या काय आहे हा आजार? याची लक्षणे आणि उपचार जाणून घ्या)

डॉ. पाठक म्हणतात की मधुमेहींना डेंग्यू संक्रमित झाल्यावर रुग्णांमध्ये थ्रॉम्बोसाइटोपेनियाचा धोका म्हणजेच कमी प्लेटलेट काउंटचा धोका वाढतो. ते म्हणाले की, काही वेळा डेंग्यूमध्ये स्टेरॉईड्सचा वापर केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे समस्या उद्भवू शकतात.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) असेही नमूद केले आहे की मधुमेहींना डेंग्यू हेमोरेजिक ताप (DHF), डेंग्यू शॉक सिंड्रोम (DSS) आणि गंभीर डेंग्यू (SD) होण्याचा धोका जास्त असतो. तज्ज्ञांच्या मते, डेंग्यूचा परिणाम रक्तातील साखरेच्या पातळीवरही होतो. एडिस डासाच्या चाव्याव्दारे होणार्‍या सुजेमुळे रुग्णांची साखरेची पातळी आधीच जास्त असते, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.

( हे ही वाचा: मधुमेहाच्या रुग्णांनी ‘या’ ५ फळांचे सेवन चुकूनही करू नये; झपाटयाने वाढेल रक्तातील साखरेची पातळी)

डेंग्यूमुळे मधुमेह नसलेल्या आणि प्री-डायबेटिसच्या रुग्णांमध्येही रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. डेंग्यूची लागण होत असताना रक्तातील साखरेची नियमित तपासणी करावी.