Mansoon Hacks: पावसाळा सुरू होताच, घरातील महिलांना धुतलेले कपडे सुकवण्याची सर्वात मोठी समस्या भेडसावते. कपड्यांना हवा मिळाली नाही किंवा कपडे नीट सुकले नाहीत तर त्यातून वास येऊ लागतो. तसंच दुर्गंधीयुक्त कपडे परिधान केल्याने माणसाला त्वचेचे आजार होण्याचा धोका असतो. जर तुम्हालाही पावसाळ्यात अशा प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागत असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा काही घरगुती टिप्स सांगणार आहोत, की ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या कपड्यांची योग्य प्रकारे काळजी घेऊ शकता. जाणून घ्या पावसाळयात कपड्यांची दुर्गंधी दूर करण्याचे उपाय.

पावसाळ्यात कपड्यांची दुर्गंधी दूर करण्याचे उपाय

१) व्हिनेगर आणि बेकिंग सोडाचा वापर

पावसाळ्यात अनेक वेळा डिटर्जंटने कपडे धुतल्यानंतरही कपड्यांतून दुर्गंधी जात नाही. अशावेळी कपडे धुण्यासाठी डिटर्जंटमध्ये थोडे पांढरे व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा पाण्यात मिसळा. असे केल्याने तुमच्या कपड्यांमधून येणारा वास निघून जाईल. तसंच कपड्यांमध्ये चांगली चमकही राहील.

२) लिंबाच्या रसाचा वापर

पावसाळ्यात आर्द्रतेमुळे ओल्या कपड्यांमधून वास येऊ लागतो. अशा परिस्थितीत कपडे धुताना लिंबाचा रस पाण्यामध्ये टाकल्यास कपड्याचा घाण वास निघून जाईल. यासाठी एक वाटी लिंबाचा रस कपडे धुवायच्या पाण्यात टाका. कपड्यांना येणारा वास लगेच निघून जाईल.

(हे ही वाचा: पावसाळ्यात बदला तुमची जीवनशैली, जाणून घ्या ‘या’ उपयुक्त टिप्स)

३) कपडे गोळा करणे टाळा

पावसाळ्याच्या दिवसात साठवलेल्या ओल्या कपड्यांमधून लवकरच दुर्गंधी येऊ लागते. अशा स्थितीत शेडमधील दोरीवर तुमचे कपडे वेगळे पसरवा, वातावरणात आर्द्रता असली तरी तुमच्या कपड्यांना वास येणार नाही. जेव्हा तुम्ही कपडे वेगवेगळे दोरीवर पसरवाल, त्यामुळे प्रत्येक कपडा नीट सुकला देखील जाईल आणि त्यामुळे कपड्यांना वास देखील येणार नाही.