केसांमुळे आपले व्यक्तीमत्व अधिक खुलते. आपले शरीर जितके निरोगी असेल तितके केससुद्धा छान राहतात. म्हणजेच केसांचे आरोग्य आपण किती पौष्टिक आहार घेतो यावर अवलंबून असते. केस गळू नयेत, मऊ आणि दाट राहावे यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. पण प्रत्येक वेळी त्यातून समाधान मिळतेच असे नाही. केसगळती या समस्येला सर्वजण त्रासलेले दिसून येतात. त्यातही शॅम्पूने केस धुतल्यानंतर केस अधिक गळतात असा अनुभव काहीजणांना आला असेल.

केसांची काळजी उत्तमरीत्या घेण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. केस जास्त गळायला लागले की सगळेच चिंताग्रस्त होतात. कारण आपण आकर्षक दिसाव असं प्रत्येकालाच वाटत असते. त्यामुळे यावर काय करता येईल यासाठी वेगवेगळे प्रोडक्ट वापरले जातात. त्यातच केस धुण्यासाठी महागड्या शॅम्पूची निवड केली जाते. पण शॅम्पूने केस धुतल्यानंतर कधी कधी केस जास्त गळतात. याचा अनुभव बऱ्याच जणांनी घेतला असेल. याबद्दल तज्ञांचे काय मत आहे जाणून घेऊया.

Skin Care Tips : चेहऱ्यावर तेज आणण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा मसाज; त्वचेला होईल फायदा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तज्ञांच्या मते शॅम्पू लावल्यानंतर होणारी केसगळती थांबवण्यासाठी केसांना हानिकारक नसणारा, सल्फेट फ्री शॅम्पू वापरावा. जेणेकरून तुमचे केस आणि टाळू कोरडे होणार नाहीत. शॅम्पू लावताना टाळूवर खूप जोरात मसाज करू नये, त्यामुळे केस अधिक गळण्याची शक्यता असते. यावरील सोपा पर्याय म्हणजे पुरेसा शॅम्पू हातात घेऊन त्याचा फेस बनवा आणि तो हळुवारपणे टाळूवर लावा. टाळूवर जास्त जोर देऊन शॅम्पू लावू नका. केस धुण्यासाठी नेहमी थंड किंवा कोमट पाण्याचा वापर करा. केस धुताना गुंता होण्याची शक्यता असते. ज्यामुळे केस गळू शकतात. म्हणून केस हळुवारपणे बोटांच्या साहाय्याने धुवा. शॅम्पू लावण्याची ही पद्धत नक्कीच उपयुक्त ठरू शकते.