Dream Interpretation: स्वप्नात साप दिसणं शुभ की अशुभ? जाणून घ्या काय सांगतं शास्त्र

अनेकदा लोकांना स्वप्नात साप दिसतो. काही लोक स्वप्नात साप दिसणं अशुभ तर काही शुभ मानतात. पण स्वप्न शास्त्रानुसार, सापाच्या स्वप्नांचा अर्थ चांगला आणि वाईटही असू शकतो. जाणून घ्या सविस्तर…

snake-dream

Snake Dreams Meaning (Swapnat Saap Disane): अनेकदा लोकांना स्वप्नात साप दिसतो. काही लोक स्वप्नात साप दिसणं अशुभ तर काही शुभ मानतात. पण स्वप्न शास्त्रानुसार, सापाच्या स्वप्नांचा अर्थ चांगला आणि वाईटही असू शकतो. जर एखाद्याला स्वप्नात खूप सारे साप दिसले तर या स्वप्नाचा अर्थ अशुभ आहे. हे स्वप्न भविष्यात समस्या दर्शवतात.

जर तुमच्या स्वप्नात एखादा साप तुमचा पाठलाग करत असेल आणि तुम्ही घाबरत असाल तर याचा अर्थ तुम्हाला कशाची तरी भीती वाटत आहे. हे स्वप्न देखील अशुभ मानले जाते. जर एखाद्या स्वप्नात साप चावला तर हे स्वप्न गंभीर आजार दर्शवते. हे स्वप्न पाहिल्यानंतर सावध व्हा. जर तुम्हाला स्वप्नात मृत साप दिसला तर हे स्वप्न शुभ मानले जाते. अशा स्वप्नाचा अर्थ असा आहे की, आपण राहू दोषामुळे उद्भवलेल्या सर्व संकटांना तोंड देत आहात.

आणखी वाचा : Surya Grahan 2021: या दिवशी असणार वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण; जाणून घ्या वेळ आणि परिणाम

स्वप्नात सापाचे दात दिसणे देखील अशुभ मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की, तुमची एखाद्याकडून फसवणूक होऊ शकते. हे स्वप्न देखील नुकसान दर्शवतात. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात साप आणि मुंगूस यांच्यातील भांडण दिसले तर याचा अर्थ असा आहे की, तुम्ही काही कायदेशीर अडचणीत येऊ शकता. हे स्वप्न न्यायालयात जाण्याचे देखील सूचित करते.

आणखी वाचा : Vivah Panchami 2021: ‘या’ दिवशी लग्न करणारे लोक खूप दुःखी जीवन जगतात, याचे खास कारण पुराणात सांगितले आहे

जर तुमच्या स्वप्नात पांढरा किंवा सोनेरी साप दिसला तर याचा अर्थ तुमचे नशीब उघडणार आहे. स्वप्नात वारंवार साप दिसला तर त्याचा अर्थ असा होतो की, तुम्हाला पितृदोष असू शकतो. जर स्वप्नात साप बिलाकडे जाताना दिसला तर याचा अर्थ असा होतो की, तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. जर एखादा साप फणा काढताना दिसला तर याचा अर्थ तुम्हाला संपत्ती मिळेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dream interpretation seeing snake in dream is auspicious or inauspicious know what the dream science says sapne mein saanp pakadna swapna arth prp

Next Story
एचआयव्ही परिक्षणाने भारतात वाचतील लाखो प्राण