scorecardresearch

Surya Grahan 2021: या दिवशी असणार वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण; जाणून घ्या वेळ आणि परिणाम

सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या ज्योतिषशास्त्रात अत्यंत अशुभ घटना मानल्या जातात. २०२१ सालातील हे शेवटचे सूर्यग्रहण असेल. यानंतर पुढील ग्रहणासाठी २०२२ सालची वाट पाहावी लागणार आहे. जाणून घ्या सविस्तर…

Surya Grahan 2021: या दिवशी असणार वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण; जाणून घ्या वेळ आणि परिणाम

Surya Grahan Occurs After Chandra Grahan November 2021: सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या ज्योतिषशास्त्रात अत्यंत अशुभ घटना मानल्या जातात. १९ नोव्हेंबरच्या झालेल्या चंद्रग्रहणानंतर १५ दिवसांनी सूर्यग्रहण होणार आहे. वृश्चिक आणि ज्येष्ठ नक्षत्रात ग्रहण होईल. २०२१ सालातील हे शेवटचे सूर्यग्रहण असेल. यानंतर पुढील ग्रहणासाठी २०२२ सालची वाट पाहावी लागणार आहे. जरी ही खगोलीय जगासाठी एक महत्त्वाची घटना आहे, परंतु धर्म आणि ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यग्रहणाच्या वेळी शुभ कार्ये करता येत नाहीत. ग्रहण काळात सूर्याला त्रास होतो, ज्यामुळे त्याचे शुभत्व कमी होतं.

या तारखेला होणार आहे वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण

वर्षातील पहिले सूर्यग्रहण १० जून रोजी झाले आणि आता दुसरे सूर्यग्रहण ४ डिसेंबर रोजी शनिवारी होणार आहे. २०२१ वर्षातील शेवटचे आणि दुसरे सूर्यग्रहण असणार असून अमावस्याही याच दिवशी आहे. मार्गशीर्ष महिन्याची ही अमावस्या असेल. सूर्यग्रहण ४ डिसेंबर रोजी सकाळी १०.५९ वाजता सुरू होईल आणि दुपारी ०३.०७ पर्यंत राहील.

हिंदू दिनदर्शिकेनुसार, विक्रम संवत २०७८ मध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या अमावास्येला सूर्यग्रहण होईल, ज्याचा वृश्चिक आणि अनुराधा आणि ज्येष्ठ नक्षत्रांवर सर्वाधिक प्रभाव पडेल.


सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य आणि चंद्र दोन्ही वृश्चिक राशीत असतील.

आणखी वाचा : Dream Interpretation: स्वप्नात साप दिसणं शुभ की अशुभ? जाणून घ्या काय सांगतं शास्त्र

सूर्यग्रहण सुतक कालावधी

४ डिसेंबर २०२१ रोजी होणारे सूर्यग्रहण हे छायाग्रहण आहे. म्हणजेच ते आंशिक सूर्यग्रहण असेल, त्यामुळे त्याचा सुतक कालावधी वैध राहणार नाही. यामुळे या सूर्यग्रहणादरम्यान सुतक काळाशी संबंधित नियमांचे पालन करावं लागणार नाही. सामान्यतः, सूर्यग्रहण दरम्यान, नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी खाणे, पिणे, बाहेर जाण्यास मनाई आहे. याशिवाय हे उघड्या डोळ्यांनी पाहू नका, अन्यथा डोळ्यांना इजा होऊ शकते.

वर्षातील हे शेवटचे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. अंटार्क्टिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिकेत ते दृश्यमान असेल.

आणखी वाचा : Vivah Panchami 2021: ‘या’ दिवशी लग्न करणारे लोक खूप दुःखी जीवन जगतात, याचे खास कारण पुराणात सांगितले आहे

सूर्यग्रहणाच्या वेळी लक्षात ठेवण्याच्या गोष्टी:

  • गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे टाळावे.
  • या दरम्यान आपल्या इष्टदेवाची मनोभावे पूजा करावी.
  • सूर्यग्रहणाच्या वेळी या मंत्राचा जप करणे फलदायी मानले जाते- “ओम आदित्य विदमहे दिवाकराय धीमहि तन्नो: सूर्य: प्रचोदयात.”
  • ग्रहणाच्या आधी तुळशीची पाने अन्नपदार्थात ठेवावीत.
  • या दरम्यान, स्वयंपाक आणि खाणे दोन्ही निषिद्ध आहे.
  • ग्रहण काळात देवाच्या मूर्तीला हात लावू नये.
  • ग्रहण काळात झोपणे देखील टाळावे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-11-2021 at 22:07 IST

संबंधित बातम्या