Winter Tips: हिवाळा जवळ आला की आपल्या शरीरावर अनेक प्रकारच्या संसर्गाचे आक्रमण होते. या काळात आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्याची गरज असते. नाहीतर आपल्याला सर्दी, खोकला, सर्दी तर होते. शिवाय अनेक आजारांनाही सामोरे जावे लागते. बदलत्या ऋतूत होणार्‍या ऋतूजन्य आजारांपासून वाचायचे असेल तर तुम्ही घरच्याघरी काही उपाय करून या आजारांवर मात करू शकता. हा उपाय करून तुम्ही सर्दी, खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळवू शकतात. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत हे लाभकारी घरगुती उपाय…

चहा हे पेय सर्वांनाच आवडतं. चहाचा सुंगध, रंग, कडकपणा यासोबत चहामध्ये काही असेही घटक असतात जे तुमच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतात. चहा अतीप्रमाणात घेणं योग्य नसलं तरी जर तुम्हाला आजारापणापासून दूर राहायचे असेल तर तुम्ही मसाला चहा नक्कीच ट्राय करू शकता. सर्दी खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी मसाला चहा अतिशय फायदेशीर ठरतो. मसाला चहामुळे शरीराला इतरही अनेक फायदे होतात. मसाला चहा कोणत्याही सामान्य चहापेक्षा अधिक फायदेशीर असतो. हिवाळ्यात मसाला चहा तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरेल. यासोबतच तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होईल. यासाठी मसाला चहा करण्याची पद्धत आणि त्याचे फायदे जरूर जाणून घ्या.

कसा कराल मसालेदार चहा?
मसाला चहा तयार करण्यासाठी आधी गॅसवर एक कप पाणी उकळून घ्या. त्यात थोडंसं आलं किसून टाका. मग अर्धा चमचा चहापावडर टाका. चहा उकळल्यावर शेवटी चहाचा मसाला टाका. चहाला मसालेदार करण्यासाठी तुम्ही त्यात वेलची, दालचिनी, लवंग, काळीमिरी, तुळशीची पाने, गवती चहा वापरू शकता. चहामध्ये साखर आणि दूधाचा वापर कमी करा. ज्यामुळे चहाचे चांगले फायदे तुम्हाला नक्कीच मिळू शकतात.

आणखी वाचा : कपड्यांची काळजी घेण्यासाठी आणि दीर्घकाळ टिकविण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मसाला चहातील घटकांचे आरोग्यदायी फायदे

  • मसाला चहा आरोग्यासाठी नेहमीच गुणकारी असतो. मात्र, हा चहा किती प्रमाणात प्यावा आणि तो कसा तयार करावा हे फार महत्त्वाचे आहे. मसाला चहात किसलेलं आलं टाकल्यामुळे चहा स्वादिष्ट लागतो. शिवाय आल्यामुळे हिवाळ्यात होणारी सर्दी, खोकला, ताप अथवा डोकंदुखीमधून तुम्हाला आराम मिळू शकतो.
  • सांधेदुखीचा त्रास असल्यास तुम्ही आलं घातलेला चहा घेतल्यामुळे नक्कीच फायदा होऊ शकतो.
  • मसाला चहामध्ये वेलची टाकल्यास तुम्हाला या चहाचा चांगला फायदा होऊ शकतो. कारण वेलचीमुळे पचनशक्ती सुधारते. ज्यामुळे तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास कमी होतो.
  • साधारणपणे थंड हवेच्या ठिकाणी अथवा हिवाळ्यात मसाला चहामध्ये काळीमिरी आणि लवंग टाकण्याची पद्धत आहे. लवंग आणि काळीमिरी या मसाल्याच्या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात अॅंटी ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते.
  • मसाला चहामध्ये दालचिनी टाकल्यामुळे चहाला एक वेगळाच स्वाद येतो. दालचिनीमुळे तुम्हाला खोकला अथवा कफाचा त्रास होत नाही.
  • तुळशीची पानं टाकून केलेला चहा आरोग्यासाठी नेहमीच उत्तम असतो. तुळस ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. चहात तुळशीची पानं टाकल्यामुळे तुम्हाला मानसिक ताणातून मुक्ती मिळू शकते.