आपल्या घरातील प्रत्येक गोष्टीवर धूळ जमा होते, पण ही सगळी धूळ काय आहे? ती कुठून येते आणि एकदा धूळ काढून टाकल्यानंतर ती परत कशी जमा होते? ती बाहेरून येते का? ही धूळ आपल्या कपड्यांमधील तंतू आहेत की आपल्या त्वचेच्या पेशी आहेत?

ऑस्ट्रेलियातील लोक त्यांच्या घरात जमा झालेली धूळ ही मॅक्वेरी विद्यापीठाच्या डस्टसेफ कार्यक्रमासाठी पाठवत आहेत. व्हॅक्यूम क्लीनरने कचरापेटीत रिकामी करण्याऐवजी ती धूळ पॅक करून आलेल्या धूळीवर मॅक्वेरी विद्यापीठाचे संशोधक विश्लेषण करत आहेत. धुळीशी संबंधित अनेक रहस्ये या कार्यक्रमा अंतर्गत जाणून घेण्यात येत आहेत. या कार्यक्रमात एकूण ३५ देशांनी सहभाग घेतला आहे.

Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
students election duty marathi news
निवडणुकीच्या कामासाठी आता विद्यार्थ्यांचीही नियुक्ती
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…

आतापर्यंतच्या अभ्यासावरून असं समोर आलं आहे की जगात सर्वत्र धूळ आहे. सर्व घरे आणि इमारतींमध्ये तसेच नैसर्गिक वातावरणातील सर्व पृष्ठभागावर ही धूळ जमा होत असते. काही धूळ ही नैसर्गिक असते. खडक, माती आणि अगदी अंतराळातून सुद्धा ही धूळ येत असते. परंतु डस्टसेफ प्रोग्राम अंतर्गत हे समोर आलं आहे की, ऑस्ट्रेलियन घरांमध्ये गोळा होणाऱ्या धूळींमध्ये धोकादायक कण देखील असू शकतात. उदारहर्णार्थ धातूचे कण, किरणोत्सर्गी पदार्थ, प्रतिजैविक-प्रतिरोधक जनुके, मायक्रोप्लास्टिक्स आणि अग्निशामक फोम, कपडे, कार्पेटला डाग आणि पाण्यापासून संरक्षित करण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ, पॅकेजिंग आणि इतर स्त्रोतांमध्ये आढळणारे परफ्लुओरिनेटेड केमिकल्स (PFAS).

घरातूनच तयार होणारी धूळ

घरातील एक तृतीयांश धूळ ही तुमच्या घरातल्या स्त्रोतांमधूनच येत असते आणि उरलेली धूळ ही हवा, कपडे, पाळीव प्राणी आणि चपलांमधून बाहेरून येते. तुमच्या आणि पाळीव प्राण्यांच्या त्वचेच्या पेशी आणि केस देखील धुळीचा भाग आहेत. कीटक, अन्नाचे तुकडे, प्लास्टिक आणि मातीपासून सुद्धा ही धूळ बनते.

काही ‘धूळ’ ही फायदेशीर सुद्धा असते. याचे पुरावे सुद्धा आहेत. कारण धूळीमुळे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते आणि अॅलर्जीचा धोका कमी होतो. परंतु घरातील स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू, तसंच खुल्या चिमणीचा वापर आणि धूम्रपान केल्याने सुद्धा तुमच्या घरात मोठ्या धूळ आणि सोबतच प्रदूषण होऊन घरातील वातावरण दूषित होतं, जे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

धूळीत रसायनांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश असतो. युनायटेड नेशन्स स्टॉकहोम कन्व्हेन्शन ऑन सस्टेनेबलने सेंद्रिय प्रदूषकांच्या यादीत सामील केलेली रसायने सुद्धा आहेत. या रसायनांमुळे कर्करोग, जन्मासंबंधीचे विकार, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे आणि प्रजनन प्रणाली आणि मज्जासंस्थेचे नुकसान होऊ शकते.

घरात जमा होणाऱ्या धूळीपैकी दोन तृतीयांश धूळ ही घरा बाहेरून येते. बागेची माती आणि रस्त्याची धूळ, तुमच्या शूज किंवा वाऱ्याद्वारे तुमच्या घरात शिरते. बाहेरची धूळ तुमच्या पाळीव प्राण्यांच्या केसांमधूनही येते. वाहनांमधून सुद्धा धूळ घरात येते. याशिवाय शेतात आणि वाळवंटातील धूळही घरात जमा होत असते. आगीमुळे वातावरणातील धूळांचे सूक्ष्म कण तयार होतात, ज्यात विषारी घटक असू शकतात.

जवळच्या खाणी आणि उद्योगांतील धूळांमध्ये विषारी घटक असतात. खराब हवेची गुणवत्ता आणि ओलसर घरे हे रोगाचे स्रोत आहेत. जंतुनाशक आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थांचा अति वापर देखील हानिकारक आहे.

धूळीविरोधात उचला ही पावलं

घरातील धूळ हा जीवनाचा एक भाग आहे. धूळ बंद घरातही गोळा होते. परंतु अशी काही पावले उचलली जाऊ शकतात, जेणेकरून घरात धूळ कमी गोळा होईल. फूटरेस्ट वापरा आणि शूज घराबाहेर काढा. घरात प्रवेश करण्यापूर्वी मुले धुळीमध्ये खेळून घरी येताना आधी हात-पाय स्वच्छ धुण्यासाठी सांगा. पाळीव प्राण्यांना स्वच्छ करा. प्लास्टिक, कीटकनाशके आणि वॉटरप्रूफिंगचा वापर कमी केल्यास रासायनिक गळती कमी होण्यास मदत होईल.

बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थांचा अनावश्यक वापर टाळा. साबण किंवा डिटर्जंट वापरून ओल्या कापडाने घरात स्वच्छता ठेवा. तसंच व्हॅक्यूम क्लीनरचा वापर उपयुक्त आहे.