घरात अनेकदा साफ-सफाई करूनही उंदीर घरात शिरतातच. एकदा उंदीर घरात शिरला कितीही प्रयत्न केला तरी बाहेर जात नाही. कधी किचनमध्ये नासधूस करतात तर कधी कपाटात शिरतातत. तसेच अनेक आजांराचा धोका वाढतो. तसेच घरामध्ये ठेवल्या जाणाऱ्या सोफा, वीजेची तार ,कपडे, धान्य भाज्यांची नासधूस करतात. तुमच्या घरातही जर उंदारांनी असा धूमाकूळ घालत असेल तर काळजी करू नका. आम्ही तुम्हाला उंदरांना न मारता त्यांच्यापासून सुटका मिळवण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स वापरून पाहा तुम्ही घरात सर्वत्र पसरलेले उंदीर गायब होतील.

तंबाकू
घरातील उंदरांना पळवून लावण्यासाठी तंबाकू वापरणे फायदेशीर ठरू शकते. त्यासाठी तंबाकूमध्ये थोडे तूप आणि बेसन टाकून छोट्या गोळ्या तयार करा आणि त्यानंतर जिथे उंदराचा वावर आहे त्या ठिकाणी टाका. तंबाकूमधील नशा असलेल्या घटकांचा उंदाराना त्रास ठरतो त्यामुळे या गोळ्या खाल्यानंतर उंदरी आपोआप घरातून गायब होतील.

हेही वाचा – क्रिती सेननलादेखील आवडतो ‘बटर मेथी पराठा’; काय आहेत याचे सहा आरोग्यदायी फायदे पाहा…

तुरटी
तुम्ही घराच्या काना-कोपऱ्यांमध्ये आणि कपटांमध्ये तुरटीचे छोटे छोटे खडे किंवा पावडर टाका. तुरटीच्या वास हा उंदरांना पळवून लावण्याचा चांगला उपाय मानला जातो. तुरटी पावडरची पेस्ट तयार करून उंदरांचा वावर असलेल्या ठिकाणी टाका त्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा कधीही उंदीर फिरकणार नाही.

कापूर
पूजेमध्ये वापरला जाणारा कापूर देखील उंदारापासून सुटका मिळवण्यासाठी उपयूक्त ठरतो. त्यामुळे घराच्या काना -कोपऱ्यांमध्ये कापूर टाका आणि त्याच्या वासामुळे उंदरांना त्रास होतो आणि ते घराबाहेर निघून जातात. पुन्हा त्या ठिकाणी जाणे टाळतात.

हेही वाचा – पायाच्या तळव्यांवर साचलेली घाण आणि मृत त्वचा काढण्यासाठी वापरा ‘हा’ खास स्क्रब; घरीच करू शकता तयार

कांद्यासह लसूचा स्प्रे वापरा
उंदराना घरापासून दूर पाठवण्यासाठी कांदा आणि लसूनचा स्प्रे देखील तुमचा मदत करू शकतो. त्यामुळे स्प्रेची बाटलीमध्ये कांदा आणि लसूनचा रस भरा आणि त्यात थोडे पाणी टाका. बाटली चांगली हलूवन रस पाण्यात एकत्र करून घ्या. आता ते घराच्या काना-कोपऱ्यामध्ये टाका. असे केल्याने उंदीर दूर पळून जातात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पेपरमिंट स्प्रे
याशिवाय उंदराना पळवून लावण्यासाठी पेपरमिंट स्प्रेचा उपयोग करू शकतात. त्यामुळे उंदरांना प्रत्येक ठिकाणी पेपरमिंट स्प्रे टाकतात आणि त्यांचा वास येताच उंदीर घराबाहेर निघून जातील.