scorecardresearch

Premium

काकडी टोमॅटोची कोशिंबीर आरोग्यासाठी चांगले की वाईट? आयुर्वेद काय सांगते ते पाहा

आहारात काकडी आणि टोमॅटोची कोशिंबीर हमखास खाल्ली जाते. परंतु, काकडी आणि टोमॅटो एकत्र खाणे आरोग्यासाठी कितपत चांगले आहे ते पाहा.

Cucumber and tomato salad healthy or not
काकडी आणि टोमॅटो एकत्र खाणे चांगले की वाईट समजून घ्या. [photo credit – freepik]

आपण जेवणात बाजूला सॅलेड म्हणून किंवा झटपट तयार होणारी म्हणून काकडी टोमॅटोची कोशिंबीर बनवतो. दाण्याचे कूट, मिरची असे पदार्थ घालून बनवलेली ही कोशिंबीर चवीला अतिशय सुंदर लागत असली तरीही ही आरोग्याच्या दृष्टीने खरंच फायद्याची आहे की नाही, याबद्दल आपण कधी विचारच केला नाही. कोशिंबिरीत घातले जाणारे दोन्ही पदार्थ म्हणजेच काकडी आणि टोमॅटो यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असून, त्यामध्ये पोषक घटकही प्रचंड प्रमाणात असतात. मात्र, काही पदार्थ एकत्र करून खाणे कधीकधी चुकीचे ठरू शकते. आयुर्वेदामध्ये या प्रकाराला ‘विरुद्ध अन्न’ असे म्हटले जाते. याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असते. आता विरुद्ध अन्न म्हणजे नेमके काय ते पाहा.

विरुद्ध अन्न

प्रत्येक पदार्थाला आपला असा एक वेगळेपण असतो, त्यामध्ये स्वतःचे गुणवैशिष्ट्ये असून प्रत्येक पदार्थ पचण्याचा वेगदेखील वेगवेगळा असतो. त्यामुळेच कधीकधी असे पदार्थ एकत्र करून खाण्याने त्याचा चुकीचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. याला सोप्या भाषेत समजवायचे झाल्यास, जेव्हा दोन विरुद्ध पदार्थ, ज्यांच्या पचनाचा वेग वेगवेगळा आहे, असे एकत्रितपणे आपल्या पोटात गेल्यास, पोटामध्ये पदार्थांचा ‘ट्राफिक जाम’ होतो. परिणामी, आपल्या पचनसंस्थेमध्ये बिघाड होतो.

‘द आयुर्वेदिक इन्स्टिट्यूट’ या वेबसाईटवरील डॉक्टर वसंत लाड या आयुर्वेद तज्ज्ञांच्या एका लेखातील माहितीनुसार, “प्रत्येक पदार्थाची आपली एक चव, गरम किंवा गार असा गुणधर्म आणि पचनानंतर होणारे परिणाम असतात. यासोबतच काही पदार्थांचा सांगता न येणारा ‘प्रभाव’ देखील होत असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या पोटात असणाऱ्या अग्नीनुसार त्यांची पचनशक्ती चांगली किंवा वाईट ठरत असल्याने, आपण कोणते पदार्थ एकत्रित खात आहोत याकडे लक्ष देणे गरजेचे असते. एकावेळी वेगवेगळ्या चवीचे, गुणधर्माचे आणि पचन गतीचे पदार्थ खाल्ल्याने पोटातील अग्नीवर त्याचा विपरीत परिणाम होऊन, पचनसंस्थेत बिघाड होऊ शकतो” असे समजते.

हेही वाचा : हिवाळ्यात कशी घ्याल बाळाच्या नाजूक त्वचेची काळजी? पाहा डॉक्टरांनी दिलेल्या या ‘पाच’ टिप्स

परंतु, हेच सर्व पदार्थ वेगळे करून खाल्ल्याने मात्र त्याचा चांगला परिणाम होऊन आपली चयापचय क्रिया चांगली होऊ शकतो.

काकडी आणि टोमॅटो एकत्रित खाणे योग्य की अयोग्य पाहा

भारतीय जेवणाच्या ताटामध्ये काकडी आणि टोमॅटोची कोशिंबीर हा पदार्थ हमखास असतोच. परंतु, आरोग्य तज्ज्ञांनुसार या दोन पदार्थांची जोडी शरीरासाठी चांगली नाही असे समजते. परंतु, यामागचे कारण तरी काय?

एकीकडे काकडीमध्ये आवश्यक पोषक घटक असून ते शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. परंतु, त्यातील काही गुणधर्मांमुळे शरीरात क जीवनसत्व शोषून घेण्यास काहीसा अडथळा निर्माण केला जातो. तर दुसरीकडे टोमॅटोमध्ये क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्याने, काकडीसोबत एकत्र केल्यानंतर शरीरातील एसिडिक पीएच [आम्लाचे Ph] बिघडण्याची शक्यता असते.

हेही वाचा : Recipe : वरणाला द्या राजस्थानी तडका; झटपट तयार होणाऱ्या आंबट-गोड डाळीची रेसिपी पाहा….

“दोन विरुद्ध किंवा चुकीचे पदार्थ एकत्र करून खाण्याने पोटामध्ये गॅस, अपचन यांसारख्या समस्या उदभवू शकतात. या समस्या जास्त काळ होत असतील तर त्याचे विपरीत परिणाम शरीरावर, आरोग्यावर होऊ शकतात”, असेदेखील डॉक्टर वसंत लाड यांच्या लेखातील माहितीनुसार समजते.

परंतु, काकडी आणि टोमॅटोची कोशिंबीर खाणे पूर्णपणे बंद करायचे का? तर नाही. खरंतर असे करणे कोणालाही शक्य होणार नाही. मग अशावेळी काय करावे यावर उपायही डॉक्टर वसंत लाड यांनी आपल्या लेखात सांगितला आहे. तुम्ही जेवण्याच्या सुरुवातीला एक लहान चमचा [tsp चमचा] किसलेले आले आणि खडे मिठाचे सेवन केल्याने पाचक रस उत्तेजित होण्यास मदत होईल. त्याचसोबत तुमच्या कोशिंबिरीमध्ये किंवा सॅलेडमध्ये काळे/खडे मीठ टाकावे; ते पचनासाठी मदत करेल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही खाणारा प्रत्येक पदार्थ नीट व्यवस्थित चावून खावा, म्हणजे पोटात गेलेले सर्व पदार्थ भरभर पचण्यास मदत होऊ शकते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eating cucumber and tomato salad is good or bad for health what experts says dha

First published on: 01-12-2023 at 16:00 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×