High Cholesterol Symtoms: कोलेस्टेरॉल हा चरबीचा एक प्रकार आहे, जो रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा करतो. यामुळे, रक्तवाहिन्या अरुंद होतात, ज्यामुळे हृदयातून रक्तप्रवाहात अडथळा येतो. आम्ही तुम्हाला सांगतो की उच्च कोलेस्टेरॉल ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये रक्तामध्ये खूप जास्त कोलेस्ट्रॉल सर्कुलेट होते. यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक सारख्या हृदयविकाराची समस्या सुद्धा उद्भवू शकते. शरीरातील उच्च कोलेस्टेरॉल शोधणे थोडे कठीण आहे. आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असते एक चांगले आणि दुसरे वाईट कोलेस्ट्रॉल. जेव्हा शरीरात बॅड कोलेस्टेरॉलची पातळी वाढते, तेव्हा त्याचे पहिले लक्षण पायांवर दिसू लागते. पायातील कोणती लक्षणे कोलेस्ट्रॉल वाढण्याचे संकेत देतात ते जाणून घेऊया

आरोग्य अहवालानुसार जर तुमच्या पायाची त्वचा पिवळी पडू लागली असेल, डोळ्याभोवती ठिपके दिसू लागले असतील किंवा तळव्यांची त्वचा हलकी निळी दिसत असेल, तर तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. हे शरीरातील खराब कोलेस्टेरॉल वाढण्याचे लक्षण असू शकते. माहितीनुसार, उच्च कोलेस्ट्रॉलमुळे शरीरातील रक्त प्रवाह कमी होतो, ज्यामुळे त्वचेचा रंग बदलू लागतो.

( हे ही वाचा: Liver Cancer risk: तोंडाच्या ‘या’ समस्येकडे दुर्लक्ष केल्यास यकृताच्या कर्करोगाचा धोका ७५% वाढतो; ‘या’ उपायांमुळे टळेल जीवावरील धोका)

पायातील ‘ही’ चिन्हे दिसतात

जर तुमच्या पायावर केसांची वाढ अचानक थांबली असेल तर ते उच्च कोलेस्ट्रॉलचे लक्षण देखील असू शकते. यासोबतच जर तुमच्या तळव्यांना काही जखम झाली असेल आणि ती सहज बरी होत नसेल तर हे जास्त कोलेस्टेरॉलमुळे लक्षण असू शकते.

उच्च कोलेस्टेरॉलची लक्षणे जाणून घेण्यासाठी , रात्री झोपताना अचानक तुमच्या पायात वेदना होत असतील तर ते टाळण्यासाठी उपाय पहा. या दरम्यान, टाचांमध्ये क्रॅम्पिंग होते, बोटांमध्ये वेदना होतात. असे रोजच होत असेल तर काळजी घेण्याची गरज आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

( हे ही वाचा : Blood Sugar: रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त झाल्यास पायात दिसतात ‘या’ गंभीर समस्या; वेळीच ओळखा नाहीतर…!)

चालताना आणि व्यायाम करताना नेहमी पाय दुखत असतील तर त्यासाठी सावध राहा. हे उच्च कोलेस्टेरॉलचे लक्षण असू शकते. जेव्हा रक्ताभिसरण कमी होते आणि पुरेसे रक्त पायांपर्यंत पोहोचत नाही तेव्हा असे होते. अशा परिस्थितीत, अनेकदा पाय जडपणा आणि थकवा जाणवते.