मैत्रीचे नाते हे आयुष्यातील सर्वात जवळच्या नात्यांपैकी एक आहे. आपल्या कुटुंबाइतकेच आपल्या आयुष्यात आपल्या जवळच्या मित्रांनाही महत्त्वाचे स्थान असते. अश्या बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपण आपल्या कुटुंबियांना सांगायला घाबरतो किंवा त्यांना सांगत नाही, पण आपल्या जवळच्या मित्राला नक्कीच सांगतो. खरं तर ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा हा स्पेशल दिवस ७ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. या खास दिवशी प्रत्येकजण आपल्या मित्र-मैत्रिणींना, जवळील सहकाऱ्यांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा देतो. त्यांच्यासोबत काही खास वेळ घालवून सेलिब्रेशन केले जातं.

पॅराग्वेमध्ये फ्रेंडशिप डे सुरू झाला. आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा करण्याचा प्रस्ताव प्रथम १९५८ मध्ये येथे मांडण्यात आला, त्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी 30 जुलै हा आंतरराष्ट्रीय मैत्री दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. म्हणूनच आजही ३० जुलैला अनेक देशांमध्ये फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. पण भारत, बांग्लादेश, मलेशिया, संयुक्त अरब अमिराती आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांसारखी राज्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करतात. ओबरलिनमध्ये हा दिवस दरवर्षी ८ एप्रिल रोजी साजरा केला जातो.

तुम्हाला OK चा फुलफॉर्म माहित आहे का? जाणून घ्या यामागची रंजक तथ्ये

मैत्री दिवस साजरा करण्याचा उद्देश

मैत्रीचा खरा अर्थ समजावून सांगण्यासाठी, त्याची भावना जिवंत ठेवण्यासाठी आणि मैत्रीचे क्षण संस्मरणीय बनवण्यासाठी दरवर्षी मैत्री दिन साजरा केला जातो. या दिवशी लोक त्यांच्या मैत्रीबद्दल त्यांच्या मित्रांचे आभार मानतात. ते एकमेकांना फ्रेंडशिप बँड घालतात आणि ही मैत्री कायम ठेवण्याचे वचन देतात. या दिवशी अनेक मित्र एकमेकांना भेटवस्तू देतात आणि त्यांचे महत्त्व दर्शवतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

म्हणून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी ‘मैत्री दिन’ साजरा केला जातो

मैत्री दिनाच्यामागे आणखी एक कथा प्रचलित आहे. असेही म्हटले जाते की, १९३५ मध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी अमेरिकन सरकारने एका निर्दोष व्यक्तीचा जीव घेतला होता. ज्या व्यक्तीला मारलं त्याच्या मित्राने नंतर मित्राच्या आठवणीत आत्महत्या केली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकी लोकांनी हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय मैत्री दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव अमेरिकन सरकार समोर ठेवला होता. त्या निर्दोष व्यक्तीचा जीव घेतल्याने जनता संतापली होती. त्यामुळे अमेरिकन सरकारने तब्बल २१ वर्षांनी १९५८ मध्ये तो प्रस्ताव मंजूर केला. यानंतर अमेरिकेच्या सरकारने हा दिवस मैत्री दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे घोषित केलं आहे.