Hair Care Tips: हिवाळ्यात कोंडयाचा त्रास होतोय? ‘हे’ घरगुती उपाय करून पहा

डोक्यातील कोंडा काढून टाकण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या कृत्रिम उत्पादनांचा वापर करतो ज्यामुळे केस खराब होतात.

home remedy on dandruff
कोंडयाचा समस्येवर उपाय (फाइल फोटो जनसत्ता)

हिवाळ्यात अनेकांना हमखास कोंड्याची समस्या जाणवते.कोरडे वातावरण आणि हिवाळ्यात थंड वारे यामुळे त्वचेची तसेच टाळूची आर्द्रता कमी होऊ लागते. त्यामुळे काही लोकांमध्ये कोंड्याची समस्या वाढते. कोंडामुळे केसांच्या अनेक समस्या उद्भवतात. जर तुमच्या केसांमध्ये कोंडा झाला असेल तर तुमचे केस वयाच्या आधी पांढरे होऊ लागतील, केस गळणे सुरू होईल आणि तुम्हाला कोरड्या केसांच्या समस्येलाही सामोरे जावे लागेल.

हिवाळ्याच्या हंगामात आपल्या केसांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. डोक्यातील कोंडा काढून टाकण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या कृत्रिम उत्पादनांचा वापर करतो ज्यामुळे केस खराब होतात. हे टाळण्यासाठी अनेक सोप्या टिप्स खूप फायदेशीर आहेत. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे कोंड्याच्या समस्येपासून बऱ्याच अंशी सुटका मिळू शकते.

(हे ही वाचा: थंड किंवा गरम? कोणत्या प्रकारच्या पाण्याने केस धुवावे?)

संत्री आणि लिंबू

सर्वप्रथम, ५ ते ६ चमचे लिंबाच्या रसामध्ये वाळलेल्या संत्र्याच्या सालीची पावडर मिसळून पेस्ट तयार करा आणि केसांच्या मुळांवर लावा. वाळलेल्या संत्र्याच्या सालीमध्ये लिंबाचा रस मिसळून लावल्याने कोंड्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.

(हे ही वाचा: Happy New Year 2022: ‘या’ ४ राशींसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी होईल शानदार)

शॅम्पूनंतर कंडिशनिंग

केस धुल्यानंतर केसांना डीप कंडिशनिंग करावे. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर तुम्ही केसांनुसार चांगले कंडिशनर निवडू शकता. याशिवाय दही, मध किंवा अंड्यापासून बनवलेले नैसर्गिक हेअर मास्कही केसांना चांगले पोषण देऊ शकतात.

(हे ही वाचा: मधुमेहाच्या रुग्णांसाठी दह्याचे सेवन फायदेशीर आहे का? जाणून घ्या)

पौष्टिक आहार आवश्यक

हिवाळ्यात अनेक आरोग्यदायी पदार्थ बाजारात उपलब्ध असतात. विशेषतः बदाम, शेंगदाणे, अक्रोड, भोपळ्याच्या बिया आणि चिया बियाणे खाल्लेले काजू केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. हेल्दी फॅट्ससोबतच यामध्ये प्रथिनेही जास्त प्रमाणात आढळतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hair care tips do you suffer from dandruff in winter try this home remedy ttg

Next Story
‘या’ जन्मतारीख असलेल्या लोकांचं २०२२ मध्ये भाग्य बदलू शकतं, धनाची देवता कुबेरची असेल विशेष कृपा
फोटो गॅलरी