Republic Day 2022 Wishes in Marathi: २६ जानेवारी २०२२ रोजी देश आपला ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. या दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली होती. तेव्हापासून हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या खास दिवशी आपण आवर्जून एकमेकांना मेसेज पाठवतो. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने तुमच्या नातेवाईकांना, मित्र परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छा, संदेश.

१. पुन्हा एकदा एकमेकांचा आदर करत आणि आपल्या देशाचा मान वाढवण्याची शप्पथ घेऊया… प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

udayanraje bhosale marathi news, udayanraje bhosale satara lok sabha marathi news
उदयनराजेंना उमेदवारीची प्रतीक्षाच
lok sabha muhurt marathi news, lok sabha marathi news
उमेदवारी अर्जासाठी मुहुर्ताची लगबग
Thailand House of Representatives approves same sex marriage
समलैंगिक विवाहाला आता थायलंडमध्येही मान्यता… हा प्रवास आव्हानात्मक कसा ठरला?
disagreement between joe biden benjamin netanyahu marathi news
विश्लेषण: गाझावरून अमेरिका-इस्रायल मैत्री संपुष्टात येईल का? यूएन ठरावातून स्पष्ट संकेत?

२.आपल्या देशात विविधता आहे आणि ती तशीच कायम टिकवून राहावे. देशातील सलोखा वाढावा. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

३.चला आपल्या देशाच्या वीर जवानांना आठवूया, त्यांनी दिलेल्या बलिदानाला आठवूया, सलाम सर्व वीरांना. प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश!

(हे ही वाचा: Republic Day 2022: प्रजासत्ता दिनासाठी पाल्याकडून ऑनलाइन किंवा ऑफलाइन भाषणाची अशी तयारी करून घ्या, वाचा सविस्तर)

४. खरा प्रजासत्ताक तेव्हाच साजरा होईल जेव्हा संविधान कागदावर न राहता त्यातील प्रत्येक अधिकार सामान्य माणसाला बजावता येईल. आपण सर्वांनी मिळून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

५. देश विविध रंगांचा, देश विविध ढगांचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा, प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा!

६. माझी मायभूमी, तुला प्रणाम
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना
भारत मात की जय
प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

७. रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत
तरी सारे भारतीय एक आहेत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रजासत्ताक दिन सर्व भारतीयांमध्ये आनंद, उल्लास आणि नवीन विचारांचा प्रेरणा देणारा असतो. भारतीय नागरिक म्हणून आपण आपल्या देशाबद्दल आपल्याला आदर आहे. आपण यासाठी सर्व घडामोडींकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. बातम्या वाचल्या पाहिजेत आणि देशात घडणाऱ्या घटना, काय योग्य व अयोग्य घडत आहे, आपले नेते काय करीत आहेत याची माहिती असणं आवश्यक आहे. सर्वप्रथम आपण आपल्या देशाचं देणं आहोत ही भावना आपल्या मनात असली पाहिजे. आपल्या देशाच्या रक्षणासाठी, गौरवासाठी आणि उन्नतीसाठी सदैव समर्पित राहू, असा संकल्प केला पाहीजे. धन्यवाद जय हिंद!