चहाची वेळ नसते पण वेळेला चहा हवाच हे आपण सर्वांनी अनुभवलं असेलच. ‘चहा’ हा जणू आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. गरमागरम कडक चहा घेतल्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवातही होत नाही. त्यातच पावसाळ्यात तर गरमागरम भजी आणि चहा हे समीकरणच बनलंय. मात्र चहासोबत दिवसाची सुरुवात करणाऱ्या लोकांना हे माहित असायला हवं की तुम्ही चहासोबत जे खात आहात ते तुमच्या आरोग्यासाठी चांगले असेलच असे नाही. कारण अनेक वेळा तुम्ही चहासोबत खाण्यासाठी चुकीचे पदार्थ निवडल्याने तुमच्या आरोग्याला अपाय होण्याची शक्यता वाढू लागते. जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांचे सेवन कधीही चहासोबत करू नये.

  • चहासोबत हळदीचे सेवन कधीही करू नका

जर तुम्ही चहासोबत हळदीचे सेवन केले तर ते तुमचे आरोग्य बिघडू शकते. वास्तविक, हळद आरोग्यासाठी चांगली असते, पण ती चहासोबत खाल्ल्याने पोटाला हानी पोहोचते.

Health Tips : सकाळी नाही, तर रात्री झोपण्यापूर्वी प्या गरम पाणी; मिळतील ‘हे’ चार आश्चर्यकारक फायदे

  • लिंबू देखील हानिकारक

तुम्ही अनेकांना लिंबाचा चहा पिताना पाहिलं असेल, पण दुधाच्या चहामध्ये लिंबू मिसळणे चांगले नाही. याचे सेवन केल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते.

  • थंड पदार्थ

चहासोबत थंड पदार्थ खाऊ नये, असे प्रौढ लोक सांगतात. ही योग्य गोष्ट आहे, कारण चहा पिण्याच्या १ तासापूर्वी किंवा चहा पिल्यानंतर थंड पिऊ अथवा खाऊ नये, अन्यथा तुमचे आरोग्य बिघडू शकते.

  • लोहयुक्त भाज्या

काही लोक चहासोबत लोहयुक्त भाज्याही खातात. असे करणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)