Healthy packaged snacks: सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा वापर लक्षणीयरित्या वाढला आहे. ऑफिस असो, मित्रांसोबत असताना किंवा पार्टीत बटाट्याचे चिप्स, पॅकेज्ड स्नॅक्स आणि जंक फूड बहुतेकदा तुमच्या प्लेटमध्ये येतात. मात्र, प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदेदेखील होतात. हो खरंच, काही पॅकेज्ड स्नॅक्स खरंच फायदेशीर ठरतात.

एनएचएस यूकेच्या एका अहवालानुसार, अतिप्रक्रिया केलेले अन्न जास्त प्रमाणात खाल्ल्याने लठ्ठपणा, टाइप-२ मधुमेह आणि ह्रदयरोगाचा धोका वाढतो. एम्स, हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड इथे प्रशिक्षित गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना तुम्हाला निरोगी आणि तंदुरूस्त राहण्यास मदत करणाऱ्या काही स्नॅक्सची यादी सांगितली आहे. या स्नॅक्सचे सेवन केल्याने तुमचे आरोग्य सुधारू शकते आणि अनेक आजार टाळता येतात.

भाजलेले चणे

जर तुम्ही कामात व्यस्त असाल आणि सतत भूक लागत असेल तर भाजलेले चणे खूप फायदेशीर ठरू शकतात. भाजलेले चणे कुरकुरीत, प्रथिने आणि फायबरने समृद्ध असतात. ते तुम्हाला बराच काळ पोटभर ठेवतात आणि चिप्ससारखे तेलकट नसतात.

एअर पॉप्ड पॉपकॉर्न

डॉ. सेठी यांनी सांगितल्याप्रमाणे, पॉपकॉर्न हा एक उत्तम पर्याय आहे. कारण तो संपूर्ण धान्यापासून बनलेला असतो आणि त्यात भरपूर फायबर असते. पण लोणी आणि कृत्रिम चव टाळा.

सुकामेवा

सुकामेवा प्रामुख्याने काजू मेंदू आणि ह्रदयासाठी फायदेशीर असतात. बदाम, अक्रोड आणि काजूमध्ये निरोगी चरबी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. ते केवळ ह्रदयासाठीच नाही तर यकृत आणि मेंदूसाठी देखील फायदेशीर आहेत.

एडमामे हे वनस्पती प्रथिनांचे पॉवरहाऊस (सोयाबीन)

एडमामे हे वनस्पती प्रथिनांचे एक शक्तिशाली उत्पादन आहे. एडमामे ज्याला सोयाबीन म्हणूनही ओळखले जाते ते वनस्पती प्रथिने आणि सूक्ष्म पोषक घटकांनी समृद्ध आहे. ते आतड्यांसाठी अनुकूल आहे आणि एक उत्तम स्नॅक्सचा पर्याय आहे.

ग्रीक योगर्ट आणि बेरी

ग्रीक योगर्ट आणि बेरीज आतडे आणि यकृताच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. ग्रीक योगर्टमधील प्रथिने आणि प्रोबायोटिक्स पचन सुधारतात, तर बेरीजमधील पॉलिफेनॉल यकृताच्या आरोग्यास प्रोत्साहन देतात. हा नाश्ता स्वादिष्ट आणि आरोग्यदायी दोन्ही आहे.

Greek yogurt Photo: Freepik

बिया

भोपळा, सूर्यफुल, चिया आणि अळशीच्या बियांमध्ये फायबर, निरोगी चरबी आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असतात. ते दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा प्रदान करतात आणि पचनसंस्थेसाठी देखील चांगले असतात.

भाजीपाल्याच्या काड्या आणि हमस

गाजर, काकडी आणि सेलेरीसारख्या भाज्यांच्या काड्या हमस (चण्यापासून बनवलेला डिप) सोबत खाऊ शकतात. ते केवळ कुरकुरीत आणि चविष्टच नाहीत, तर आतड्यांना अनुकूल फायबरनेदेखील समृद्ध असतात.

Vegetable sticks with hummus Photo: Freepik