Ankita Lokhande’s Detox Juice :’पवित्र रिश्ता’फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे अलीकडेच रुबीना दिलैकबरोबर तिच्या यूट्यूब पॉडकास्ट ‘किसीने बताया नहीं’च्या नवीन सीझनमध्ये दिसली, जिथे तिने तिच्या सकाळच्या दिनचर्येबद्दल खुलासा केला. अंकिताने यावर भर दिला की, “जरी तुम्ही दिवसभरात थोडासा आराम केला तरी ‘सकाळचा दिनक्रम अत्यंत उपयुक्त आहे.’ त्यामुळे माझी त्वचा, आरोग्य आणि झोप खूप चांगली झाली आहे आणि तुम्हाला स्वतःबद्दल चांगले वाटते. मग मी अंघोळ करते, परत येते आणि नंतर अर्धा तास पूजा करते,” हे ऐकून रुबिना म्हणते की, “असे दिसते की, संपूर्ण डिटॉक्स सकाळीच होतो.”
अंकिता लोखंडेचं सकाळचं आरोग्य रूटीन (Ankita Lokhande’s Morning Detox Routine)
४० वर्षीय अंकिता म्हणाली की, “सकाळी उठताच माझ्याकडे एक मोठा ट्रे येतो, ज्यामध्ये भिजवलेले मेथीचे दाणे आणि दालचिनीचे पाणी असते; त्यात एक चमचा ओवा, जिरा, बडीशेपच्या पावडरचे मिश्रण आणि ताजे कापलेले शुद्ध कोरफडीचा गर असतात. त्यात लसूण, केशर पाणी, शिलाजित पाणीदेखील असते. मी व्हिटॅमिन सी कॅप्सूल घेते. हे १.५-२ लिटर पाणी असते. मी दररोज सकाळी उठल्याबरोबर हे पिण्यास सुरुवात करते, या सर्वांमुळे माझ्यात बदल झाले आहेत.”
एवढंच नाही, ती भाज्यांचा रसही पिते. “बीट, नारळाचे पाणी आणि रात्रभर भिजवलेल्या बियांचे मिश्रण असलेला एक रस आहे, तो मी पिते आणि मी माझा पती विकी जैनलाही तो प्यायला लावते.”
अंकिताने सांगितलेला डिटॉक्स ज्यूस तेजस्वी त्वचेसाठी आवश्यक आहे का, ते तज्ज्ञांकडून समजून घेऊया.
तुमच्यासाठी हा उपाय योग्य ठरेल का? (Is This Detox Suitable for You?)
ठाणे येथील किम्स हॉस्पिटल्सच्या मुख्य आहारतज्ज्ञ असलेल्या डॉ. गुलनाज शेख म्हणाल्या की, “यातील बरेच घटक पारंपरिक आरोग्य पद्धतींमधून येतात. उदाहरणार्थ, मेथी आणि दालचिनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास आणि चयापचय सुधारण्यास मदत करू शकतात. जिरे आणि ओवा पचनास मदत करतात आणि पोटफुगी कमी करतात. कोरफड मध्यम प्रमाणात घेतल्यास आतडे शांत करू शकतात आणि त्वचेचे आरोग्य वाढवू शकतात. लसूण पेस्ट दाह-विरोधी आणि कोलेस्ट्रॉल कमी करणारे परिणाम प्रदान करू शकते. मूड सुधारण्यासाठी आणि हार्मोनल समर्थनासाठी अनेकदा लोक केशर पाणी पितात. याव्यतिरिक्त शिलाजित, जर सुरक्षितपणे मिळवले तर ते नैसर्गिक ऊर्जा बूस्टर म्हणून पाहिले जाते. पण, एकूण फायदा सुसंगतता, भाग आकार आणि वैयक्तिक शरीर प्रकारावर अवलंबून असतो,” असे शेख सांगतात.
अशा पेयांपासून कोणाला फायदा होऊ शकतो? (Who can benefit from such morning drinks?)
शेख यांच्या मते, “ज्यांचे पोट फुगलेले आहे किंवा ज्यांना सुस्तावल्यासारखे वाटत आहे किंवा पचन किंवा चयापचय वाढविण्यासाठी नैसर्गिक मार्ग शोधत आहेत, त्यांना काही फायदे मिळू शकतात. पण, पुन्हा ते प्रत्येकासाठी सारखे नसते. प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार त्यात बदल आणि संयम आवश्यक आहे. तुमच्या शरीराचे ऐकणे आणि तुमच्या गरजा पूर्ण करणारा दिनक्रम तयार करणे चांगल.”
आरोग्यासाठी असे गुंतागुतीची सकाळच्या दिनचर्येचे पालन करणे आवश्यक आहे का? (Is it necessary to follow such an elaborate morning routine for health?)
अजिबात नाही, शेख यांनी जोर दिला. “दिवसाची जाणीवपूर्वक सुरुवात करणे उपयुक्त असले तरी तुम्हाला त्या गुंतागुंतीच्या दिनचर्येचे पालन करण्याची गरज नाही. तुमची जीवनशैली आणि शरीरासाठी काय योग्य आहे ते शोधणे हे अधिक महत्त्वाचे आहे. जर एखाद्याला विशिष्ट दिनचर्येचे पालन करणे चांगले वाटत असेल आणि ते त्यांच्यासाठी शाश्वत असेल तर ते उत्तम आहे. इतरांसाठी संतुलित नाश्ता, योग्य हायड्रेशन आणि थोडी हालचालदेखील तितकेच प्रभावी असू शकते.”
हे घरगुती उपाय वापरण्यापूर्वी काय लक्षात ठेवले पाहिजे?(What should one keep in mind before trying these home remedies?)
शेख यांनी यावर भर दिला की, “नैसर्गिक म्हणजे नेहमीच सुरक्षित नसते.”
“एलर्जी, वैद्यकीय परिस्थिती किंवा औषधांशी परस्परसंवाद यामुळे समस्या उद्भवू शकतात. उदाहरणार्थ, शिलाजितची शुद्धता तपासणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकजण रिकाम्या पोटी कच्चा कोरफड किंवा लसूण सहन करू शकत नाही. अनेक घटक एकत्र मिसळण्यापूर्वी नेहमी एका वेळी एक घटक वापरून पाहा. जर तुम्ही गर्भवती असाल, मधुमेही असाल किंवा औषधे घेत असाल तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या,” असे शेख यांनी स्पष्ट केले.