scorecardresearch

Premium

Health Special : तुम्ही गॅस खाताय का?

अशी माहिती ऐकल्यानंतर सर्वसामान्यांच्या पोटात गोळा येणं स्वाभाविक आहे आणि वैज्ञानिक माहिती असणाऱ्यांना हसावं की हे थांबवावं असा प्रश्न पडतो.

Do we consume gas while eating?
आपण खरंच गॅस खातो का? (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पल्लवी सावंत पटवर्धन

मानसीचा मला मेसेज आला – “पल्लवी मी तुला एक व्हिडीओ पाठवलाय. म्हणजे इतके वर्ष आम्ही सगळे गॅस खातोय ? मला आता सगळ्याचीच भीती वाटतेय. हे खरं असेल तर लोकांनी फक्त डिमसम नाहीतर उकडलेलंच अन्न खायला हवं.”

satyashodhak kamaltai vichare, satyashodhak kamaltai vichare information in marathi,
स्त्रियांच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या सत्यशोधक कमलताई विचारे
Loksatta anyatha concepts of Litefest and Sahitya Samelan Jaipur Litefest
अन्यथा: उंटावरची ‘शहाणी’!
money mantra Audit Income Tax Act applicable
Money Mantra : प्राप्तिकर कायद्यातील लेखापरीक्षण कोणाला लागू आहे?
Infosys Narayana Murthy Consumer Brand
Narayan Murthy: ”लोकांना वाटते त्यांच्याकडे विशिष्ट फोन अन् घड्याळ असेल तर…,” नारायण मूर्तींनी यशस्वी ब्रँडसाठी दिल्या महत्त्वाच्या टिप्स

एका पॉडकास्टमध्ये एक तरुण समोरच्या तरुणाला प्रश्न विचारत होता. अत्यंत गहन आणि त्याच वेळी वैचारिक भावना चेहऱ्यावर ठेवत समोरच्या तरुणाने म्हटलं “तुम्हाला माहितेय का पोळी गॅसवर भाजल्याने आपण गॅसमधून एलपीजी खातोय दररोज. न्यूट्रिशन तर दूर पण असा एलपीजी खाणं भयंकर आहे.”

आठवड्यापूर्वी मी अशाच एका पॉडकास्टमध्ये “तुम्ही ज्या व्हिटॅमिन्स च्या गोळ्या खाता त्यात अक्षरशः केमिकल आणि फॅट्स असतात असा अत्यंत जेनेरिक दावा केला गेला.“
अशी माहिती ऐकल्यानंतर सर्वसामान्यांच्या पोटात गोळा येणं स्वाभाविक आहे आणि वैज्ञानिक माहिती असणाऱ्यांना हसावं की हे थांबवावं असा प्रश्न पडतो.
म्हणजे समाज प्रबोधनाच्या नावाने केवळ खमंग चर्चा करता मनोरंजन आणि धक्कातंत्र याचाच वापर व्हायला हवा या तत्त्वाने अर्धवट माहिती देणाऱ्या काही पॉडकास्ट पाहून आहार आणि गैरसमज यावर पुलंनी एक वेगळा एकपात्री प्रयोग रंगवला असता इतकं नक्की !

हेही वाचा : Health Special : आरोग्य ढासळण्याची कारणं काय आहेत?

गेले काही महिने समाज माध्यमांवर वेगवेगळ्या प्रकारच्या पोषण विषयक किंवा आहार विषयक सल्ल्यांचा ससेमिरा सुरू आहे. आजची भीषण बातमी या मथळ्याखाली अर्धवट माहितीचा महापूर आल्यासारखे आहारविषयक समाज गैरसमज अगदी सहज पसरू शकतात .

त्यातून आपल्या मनात वेगवेगळ्या शंकांचा उगम होत असतो आजच्या लेखात अशाच काही शंकांविषयी आणि या शंकांचे निरसन करण्याचा छोटासा प्रयत्न!

१. पोळी आणि गॅस :

समाज कोणत्याही प्रकारची पोळी किंवा भाकरी गॅसवर डा​यरेक्ट भाजू नका कारण तुमच्या पोटात गॅस जाऊ शकतो इथे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे हे आपल्या प्रत्येकाच्या घरात असणारा एलपीजी सिलेंडर किंवा पाईप गॅस द्वारे येणार एलपीजी हा ज्या वेळेला तुम्ही एखाद्या शेगडीच्याद्वारे तुमचा अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापरता तो गॅस! त्यावेळी शेगडीची रचना अशा प्रकारे केलेली असते की त्यामध्ये एका योग्य प्रकारे फिल्टरेशन होईल एक प्रकारे एलपीजीचा जो मुद्दा आहे तो गाळून त्यानंतर चांगल्या इंधनाच्या माध्यमातून आपल्याला आवश्यक इंधन पुरविले जाते. त्यामुळे आपण एलपीजी खात नाही.

२. फळांमध्ये ट्रायग्लिसेराईड्स असतात. फळांमुळे फॅट वाढते . फळांमध्ये उत्तम प्रमाणात कर्बोदके (म्हणजे कार्ब्स ) तसेच विविध व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स म्हणजेच पोषकतत्वे आणि खनिजे यांचे प्रमाण फळामध्ये उत्तम असते.
जेवणासोबत किंवा संपूर्ण जेवणांनंतर लगेच फळ खाल्ल्यास तुमच्या पचनास बाधा येऊन शरीरात साखरेचे प्रमाण वाढू शकते ज्यामुळे तुमच्या शरीरात ग्लिसेराईड्स वाढून ट्रायग्लिसेराईड्स वाढतात. मात्र फळांमध्ये फॅट्स किंवा स्निग्धांश साधारण शून्य प्रमाणात असतात.
( अवोकाडो या फळात मात्र चांगले फॅट्स उत्तम असतात -आणि ते शरीराला आवश्यक असतात )

३. कडधान्ये आणि डाळी वाईट कारण त्यात फायटेट असते.

मिसळ , मेतकूट ,भाजणी ,पोडी अशा मिश्र डाळी किंवा कडधान्ये आपल्या आहाराचा वर्षांनुवर्षे भाग आहे.
प्रथिनांचा योग्य समतोल साधताना मिश्र डाळी किंवा कडधान्ये आपल्या आहाराचा भाग असणे पूरक आहे.
कडधान्यांमध्ये असणारे फायटेट कमी निघून जावे यासाठी ती भाजली जातात, भिजवली जातात आणि शिजवली देखील जातात. त्यामुळे मिश्रा कडधान्यांनी कोणतेही नुकसान होत नाही.

हेही वाचा : Mental Health Special : तुम्ही तुमचा फोन, टॅब सार्वजनिक ठिकाणी चार्जिंगला लावलाय का?

४. भात खाणे म्हणजे जास्तीच्या वजनाला आमंत्रण

भात खाणे कधीही वाईट नाही. किंबहुना तुमच्या आहारात जर भात डाळ आणि इतर कर्बोदके योग्य प्रमाणात असतील तर तुमचे आरोग्य उत्तम राहू शकते. ज्यांना मधुमेह आहे त्यांना विशिष्ट प्रकारचा भात – तांबडा , कमी प्रक्रिया केलेला तांदूळ खायला काहीच हरकत नाही. मात्र भाताचे प्रमाण आणि दिवसभराच्या कर्बोदकांचे प्रमाण यांचा मेळ बसणे आवश्यक आहे.

५. शून्य तेलाचे जेवण – संपूर्ण जेवण

कोलेस्ट्रॉल वाढलंय त्यामुळे आम्ही तेलाचं खात नाही. आम्ही तेलाचं खात नाही असे म्हणणारे अनेक जण असतात . कोणत्याही आहारात स्निग्ध पदार्थ अतिशय महत्वाची भूमिका बजावतात. किंबहुना प्रत्येज पेशींभोवतालचे आवरण प्रथिने आणि स्निग्धांशानी बनलेलं आहे त्यामुळे शून्य तेलाचा स्वयंपाक कार्यापेक्षा किमान तेलाचा वापर नेहमीच्या आहारात होणे आवश्यक आहे. किंबहुना खाताना योग्य प्रमाणात तेल त्यातील प्रथिनांचे पचन हलके करते.

तुम्ही असे काही आहारविषयक विचार ऐकले असतील तर मला नक्की कळवा .

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Are you consuming gas in your daily meals hldc css

First published on: 04-12-2023 at 20:03 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×