Blood sugar according age and gender: बहुतेक लोक रक्तातील साखरेचा संबंध मधुमेहाशी जोडतात, मात्र प्रत्यक्षात ते रक्तातील ग्लुकोजच्या पातळीशी संबंधित आहे. ग्लुकोज हा आपल्या शरीराचा ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत आहे आणि तो आपल्याला अन्नातून मिळतो. आहारातील भात, ब्रेड, बटाटे आणि फळे यांसारखे कार्बोहायड्रेट खाल्ल्यानंतर ते ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतात आणि रक्ताद्वारे पेशींना ऊर्जा पोहोचवतात. रक्तातील साखरेची संतुलित पातळी आपल्या शरीराला आणि मनाला शक्ती देते. असं असताना जर साखरेची पातळी कमी झाली तर अशक्तपणा, चक्कर येणे, घाम येणे आणि शुद्ध हरपणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जर रक्तातील साखरेचे प्रमाण दीर्घकाळ जास्त राहिले तर ते मधुमेहाचे लक्षण आहे आणि ह्रदय, मूत्रपिंड, डोळे आणि नसा यांना गंभीर नुकसान पोहोचवू शकते.

सामान्य व्यक्तीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण जेवणानंतर ७०-१०० मिलीग्राम आणि ९०-१४० मिलीग्राम असावे. मधुमेह नसलेल्या वृद्धांमध्ये हे प्रमाण काहीसे बदलते. ते ८०-११० मिलीग्राम उपवासाच्या वेळी आणि जेवणानंतर १००-१४० मिलीग्रामपर्यंत असते. रक्तातील साखरेचे प्रमाण वय आणि महिला-पुरूष यांनुसार देखील बदलते.

  • मुलांमध्ये जलद चयापचय झाल्यामुळे त्यांची सामान्य साखरेची पातळी प्रौढांपेक्षा थोडी कमी असू शकते.
  • वृद्धांमध्ये इन्सुलिन संवेदनशीलता कमी होते, त्यामुळे साखरेची पातळी वाढू शकते.
  • महिलांमध्ये मासिक पाळी, गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती यासारख्या हार्मोनल बदलांचा साखरेच्या पातळीवर परिणाम होतो.
  • पुरूषांमध्ये स्नायूंचे प्रमाण जास्त असते आणि ते ग्लुकोजचा वापर वेगळ्या पद्धतीने करतात.

सोप्या भाषेत सांगायचं तर रक्तातील साखरेची पातळी वय आणि महिला-पुरूष यानुसार बदलते. अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या सराव मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सामान्य रक्तातील साखरेची श्रेणी वयोगटानुसार काहीशी बदलते.

अमेरिकन डायबिटीज असोसिएशननुसार, वय आणि महिला-पुरूष यानुसार रक्तातील साखरेची पातळी

मुले (०-१२ वर्षे)उपवास७०-१००८०-१३०
जेवणानंतर २ तासांनी ९०-१४०१८०
झोपण्यापूर्वी९०-१४०११०-२००
किशोरवयीन मुले (१३-१९ वर्षे)उपवास७०-१००८०-१३०
जेवणानंतर २ तासांनी
९०-१४०
१८०
झोपण्यापूर्वी
९०-१४०
१००-१८०
प्रौढ (२०-५९ वर्षे)उपवास७०-१००८०-१३०
जेवणानंतर २ तासांनी १४०१८०
HbAlc (सरासरी ३ महिन्यांचे)५.७%७%
वृद्ध (६० हून अधिक वयाचे)उपवास७०-११०९०-१५०
जेवणानंतर २ तासांनी १५०२००
झोपण्यापूर्वी१००-१४०११०-२००
गर्भवती महिलाउपवास७०-९५९५
जेवणानंतर १ तासाने<१२०१४०
जेवणानंतर २ तासांनी
<१२०
१२०

मधुमेह नसलेल्या व्यक्तींसाठी रक्तातील साखरेची पातळी

वयरिकाम्या पोटीखाल्ल्यानंतर २ तासांनीHbAlc
०-५ वर्षे१००-१८०१८०६.०
६-१२ वर्षे९०-१८०१४०-१८०६.०
१३-१९ वर्षे९०-१३०१४०५.७
२०-५९ वर्षे७०-९९१४०५.७
६०+ वर्षे७०-१००१४०५.७

मधुमेहींसाठी रक्तातील साखरेची पातळी

वयरिकाम्या पोटीखाल्ल्यानंतर २ तासांनीHbAlc
०-५ वर्षे१००-१८०२००७.५ %पर्यंत
६-१२ वर्षे९०-१८०२००७.५ %पर्यंत
१३-१९ वर्षे९०-१३०१८०७.५ %पर्यंत
२०-५९ वर्षे८०-१३०१८०७.०
६०+ वर्षे८०-१४० १८०-२००७.५-८.०