Benefits of walking: बॉलीवूड अभिनेता शक्ती कपूरने नुकतेच आपल्या फिटनेसचे रहस्य उघड केले. जेव्हा स्टँड-अप कॉमेडियन कपिल शर्मा याने सांगितले की अभिनेता दररोज ३५,००० पावले चालतो, तेव्हा ७२ वर्षीय शक्ती कपूर यांनी म्हटले, “मी चालायचो, पण आता मी पुन्हा चालायला सुरुवात केली आहे.”

या विचारातून चला समजून घेऊया की, विशेषत: वय वाढल्यावर किती चालणे महत्त्वाचे आहे…

डॉ. नरेंद्र सिंघला, प्रमुख सल्लागार, अंतर्गत औषध, सीके बिर्ला हॉस्पिटल (आर), दिल्ली, म्हणाले की, विशेषत: वयोवृद्धांसाठी दररोज ३५,००० पावले चालल्याने आरोग्याचे अनेक फायदे होऊ शकतात. “नियमित चालणे हे हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते, कारण हे रक्तदाब कमी करण्यास, रक्ताभिसरण सुधारण्यास आणि हृदयाच्या आजाराचा धोका कमी करण्यास मदत करते. तसेच वजन नियंत्रित करण्यासाठी हा एक प्रभावी उपाय आहे, जो वयोवृद्धांसाठी महत्त्वाचा आहे; कारण त्यांना स्थूलतेसंबंधी आरोग्य समस्या होण्याचा धोका असू शकतो,” असे डॉ. सिंघला म्हणाले.

हेही वाचा… तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…

बडॉ. सिंघला यांच्या मते, चालणे गतिशीलता आणि लवचिकता सुधारते, जे वयोवृद्ध वयात स्वावलंबी राहण्यासाठी मदत करते. “नियमित चालल्याने सांध्यांची गतिशीलता वाढते, ज्यामुळे दैनंदिन क्रियाकलाप सोपे होतात. तसेच संशोधन दर्शवते की, चालणे दीर्घकालीन आजारांचा धोका कमी करू शकते. जसे की टाइप २ मधुमेह, काही कर्करोग आणि ऑस्टियोपोरोसिस रोग, हे प्रतिबंधात्मक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे,” असे डॉ. सिंघला म्हणाले.

हेही वाचा… वय वाढल्यामुळे वारंवार पोटाचे आजार होतायत? वृद्धत्वामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो ‘असा’ परिणाम; वाचा, तज्ज्ञांचा सल्ला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जरी चालण्याचे अनेक फायदे असले तरी दररोज ३५,००० पावले चालण्यामध्ये काही धोके आहेत, विशेषत: वयोवृद्धांसाठी हे धोक्याचे ठरू शकते, असा इशारा डॉ. सिंघला यांनी दिला. “दीर्घ अंतर चालल्यामुळे सांध्यांवर, विशेषत: कंबर, गुडघे आणि टाचांवर जास्त ताण पडू शकतो, ज्यामुळे ताण, लचक भरणे किंवा मुरगळणे किंवा फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. उष्ण हवामानात किंवा योग्य प्रमाणात पाणी न प्यायल्यास निर्जलीकरण आणि उष्णतेमुळे थकवा होण्याचा धोका वाढतो. तसेच अत्याधिक किंवा वारंवार चालल्यामुळे शरीरावर जास्त ताण पडू शकतो, विशेषत: त्या लोकांवर, जे आधीच काही आरोग्य समस्यांनी त्रस्त आहेत,” असे डॉ. सिंघला म्हणाले.

टिप्स

  • चालताना तुमच्या स्टेप्सची संख्या हळूहळू वाढवून सुरुवात करा, ज्यामुळे तुमचे शरीर हळूहळू त्यास अनुकूल होईल.
  • चालण्याबरोबरच स्नायू शक्ती आणि समतोल वाढवण्यासाठी ताकद वाढवणाऱ्या व्यायामांचा समावेश करा, ज्यामुळे इजा होण्याची शक्यता कमी होऊ शकते.
  • हायड्रेटेड राहिल्याने आणि संतुलित आहार घेतल्याने तुम्हाला चालण्याची नियमितता राखण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळेल.
  • चालण्यासाठी एखादा साथीदार शोधल्याने प्रोत्साहन आणि जबाबदारी वाढू शकते, ज्यामुळे तुमच्या दैनंदिन चालण्याचा आनंद वाढेल आणि तो नियमित राहील, असे डॉ. सिंघला यांनी सांगितले.